Delhi Shocker: सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टर विद्यार्थ्याची आत्महत्या, नैराश्यात असल्याने उचलले टोकाचे पाऊल
दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात तृतीय वर्षात शिकणारा पदव्युत्तर विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Delhi Shocker: दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात तृतीय वर्षात शिकणारा पदव्युत्तर विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टराने निवाशी भाड्याच्या घरात पंख्याला अटकलेल्या अवस्थेत सापडला. शनिवारी आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे एक घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. सुसाईड नोटमध्ये लिहल्या प्रमाणे गेल्या दोन वर्षापासून नैराश्याने त्रस्त असल्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-केरळमधील रिसॉर्टमध्ये सापडला एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह, आत्महत्येचा संशय, तपास सुरु)
मिळालेल्या माहितीनुसार,जय दिपेश सावला (२५) हा मुळचा मुंबईतील कांदिवली येथील रहिवाशी होता. शुक्रवारी दुपारी ३.५५ वाजचा हौज खास पोलिस स्टेशनला पीसीआर कॉल आला ज्यामध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गौतम नगर येथील घटनास्थळी धाव घेतला. पोलिसांनी पंख्याला लटकेलाअवस्थेत दिसून आला. बेडशीटच्या मदतीने तरुणाने पंख्याच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ मृतदेह बाहेर काढला आणि एम्स रुग्णालयात पाठवला. रुग्णालयात डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले आहे.
पोलिसांकडून जय दिपेश सावला यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. पोलिसांनी मृताचे वडिल आणि इतर नातेवाईकांचे जबाब नोंदवला. पोलिसांनी तरुणाच्या रुममधून सुसाईट नोट ताब्यात घेतली. त्यात तो डिप्रेशनमध्ये असल्याचे समजले. सावला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (FORDA) सावला यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ ट्विट केला. तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.