Delhi Police Suicide: राहत्या घरात एसीपीची गोळी झाडून आत्महत्या, दिल्लीत खळबळ
दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पत्नीच्या निधनानंतर एसीपीने राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
Delhi Police Suicide: दिल्लीत एका खळबळजनक घटनेने शहर हादरलं आहे. दिल्ली पोलिस असलेले एसीपी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. अनिल सिसोदिया असं आत्महत्या करणाऱ्या पोलीसांचे नाव आहे. बुधवारी त्यांनी जंगपुरा येथील राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. अनिल सिसोदिया यांच्या पत्नीचा तीन दिवसांपुर्वी निधन झाल्याचे घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी सांगितले. राहत्या घरात त्यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. बंदुकीचा आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी पोलिसांना ही घटना सांगितली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
#WATCH | A 55-year-old ACP of Delhi Police, identified as Anil Sisodia, allegedly died by suicide by shooting himself at his residence in Jangpura. His wife passed away three days back: Delhi Police https://t.co/kxDiZ8nqYK pic.twitter.com/YgE797ndDM
— ANI (@ANI) October 4, 2023
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2023 08:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

