Uttar Pradesh: ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करणच्या ताफ्याने 3 मुलांना चिरडले; 2 जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण भूषण यांच्या ताफ्याच्या गाडीला हा अपघात झाला. त्यावेळी करण ताफ्यात होता की नाही याचा तपास केला जात आहे. करण भूषण यांचे नाव तक्रारीत नाही. तक्रारीच्या आधारे कर्नलगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karan's convoy crushed 3 boys 2 people died (PC -X/@SachinGuptaUP)

Uttar Pradesh: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचा मुलगा आणि भाजप उमेदवार (BJP candidate) करण भूषण शरण सिंह (Karan Bhushan Sharan Singh) यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला आहे. फॉर्च्युनर कारने 3 मुलांना चिरडले आहे. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथील कर्नलगंज हुजूरपूर रोडवरील बैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून ग्रामस्थांनी फॉर्च्युनर कार ताब्यात घेतली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा दाखल झाला असून मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण भूषण यांच्या ताफ्याच्या गाडीला हा अपघात झाला. त्यावेळी करण ताफ्यात होता की नाही याचा तपास केला जात आहे. करण भूषण यांचे नाव तक्रारीत नाही. तक्रारीच्या आधारे कर्नलगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉर्च्युनर कार आणि तिच्या चालकाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई करत आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (हेही वाचा -Sexual Harassment Case: ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी आरोप निश्चित)

कोण आहे करण भूषण सिंग?

यूपीच्या कैसरगंज लोकसभा जागेवर भाजपने विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट रद्द करून त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. करण हा ब्रिजभूषण यांचा धाकटा मुलगा आहे. डबल ट्रॅप नेमबाजीत तो राष्ट्रीय खेळाडू राहिला आहे.  (हेही वाचा -Brij Bhushan Sharan Singh Grants Regular Bail: लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर)

पहा व्हिडिओ - 

करणने बीबीए आणि एलएलबी केले असून ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे. सध्या ते यूपी रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. करण पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहे. करणचा मोठा भाऊ प्रतीक भूषण हे गोंडा सदरमधून भाजपचे आमदार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now