Goods Train Caught Fire at Odisha: ओडिशात पुन्हा रेल्वे अपघात; कोळसा भरलेल्या मालगाडीच्या डब्यात आग, Watch Video
शनिवारी सकाळी बोगीतून धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तत्काळ बालेश्वर अग्निशमन विभागाला माहिती दिली.
Goods Train Caught Fire at Odisha: ओडिशातील रेल्वे अपघातांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता कोळशाने भरलेल्या मालगाडीला आग (Goods Train Caught Fire) लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले ही अभिमानाची बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रूपसा रेल्वे स्थानकावर शुक्रवारपासून कोळशाने भरलेली मालगाडी उभी होती. शनिवारी सकाळी बोगीतून धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तत्काळ बालेश्वर अग्निशमन विभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवली. कोळसा भरलेल्या मालगाडीला आग कशी लागली हे स्पष्ट झालेले नाही. रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा -Aguwani-Sultanganj Ganga Bridge: आठ वर्षाहून अधिक दिवस बांधलेल्या 'अगुवानी-सुलतानगंज गंगा पूला'चा मलबा 10 दिवसांत हटवण्यात येणार; मुंबईहून दाखल झाले तज्ज्ञांचे पथक)
बाळूगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर ट्रेन उभी होती, असे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी भुवनेश्वर बेरहामपूर मेमो ट्रेन क्रमांक 08441 ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून जात होती. मात्र, कोळसा भरलेल्या ट्रेनच्या वॅगन क्रमांक 14 मधून धूर निघत असल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ बाळूगाव स्टेशन मास्टर आणि बाळूगाव आरपीएफ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
बहनगा स्टेशनवर झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या रेल्वे अपघातातील बळी आजही मृत्यूशी झुंज देत आहेत. यानंतर जाजपूर रोड येथे झालेल्या रेल्वे अपघातात 6 मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे.