जर सरकारने कृषी कायदे रद्द केले नाहीत तर शेतकरी संसदेला घेराव घालतील- राकेश टिकैत; 23 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
जर सरकारने कृषी कायदे रद्द केले नाहीत तर शेतकरी संसदेला घेराव घालतील, असे राजस्थानच्या सीकरमधील किसान महापंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले आहेत.
दिल्लीतील बुरारी येथील एका घरावर छापेमारी करत Alprazolam च्या 2700 गोळ्या, Tramadol च्या 2835 गोळ्या आणि 100 Ampoules injections सह 6.9 किलोचे Codeine मुंबई NCB कडून जप्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात मागील 24 तासांत 6218 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 21,12,312 वर पोहोचली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून वरवरा राव यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. 2016 मध्ये झालेल्या सूरजागड लोह खनिज जाळपोळ प्रकरणात वैद्यकीय कारणावरून वरवरा राव यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी आपण नियमांचे काटेकोर पालन करूया. 'कोरोना मला होणार नाही', 'कोरोना संपला' असा निष्कर्ष काढून नियमांकडे दुर्लक्ष करू नका. अनेक शहरांत रुग्णसंख्या वाढत आहे. हे चिंताजनक आहे. हे टाळण्यासाठी स्वयंशिस्त हाच प्रमुख मार्ग आहे, असे काँग्रेस आमदार धिरज देशमुख यांनी केले आहे.
भारतामध्ये मागील काही दिवस कोरोना अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असतानाच आता मुंबई सह महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मात्र, रविवारी (21 फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा कोविड 19 गाईडलाईनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये नागरिकांनी मास्क, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचेआवाहन केले आहे.
लॉकडाऊन हे कोणालाच नको आहे, परंतु तरीही विविध भागात किंवा गर्दीच्या ठिकाणी अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. लोकांच्या या निष्काळजी वृत्तीमुळे आता मुंबई पोलिसांनाही विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर दंड आकरण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रात सोमवारी (22 फेब्रुवारी) 5 हजार 210 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज नवीन 5 हजार 035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19 लाख 99 हजार 982 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53 हजार 113 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)