Student Suicide: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुरतमधील धक्कादायक प्रकार

त्यामुळे त्याने रागाच्या भरात हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Student Suicide: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुजरातमधील सुरतमध्ये ही घटना घडली आहे. तनिश झुनझुनवाला असं या मुलाचं नाव आहे. तनिशचं अभ्यासात दुर्लक्ष झाल्याने त्याचे वडील ओरडले. त्यामुळे या रागातून त्याने आपले जीवन संपवलं. तनिश सुरतमध्ये वेसू भागातील फ्लॉरेन्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याने घरातचं आपल्या आयुष्याचा शेवट केला. तनिशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी तनिशला मृत घोषीत केलं.

प्राथमिक अंदाजानुसार, तनिशचे वडील त्याला अभ्यासावरून ओरडले होते. त्यामुळे त्याने रागाच्या भरात हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. तनिशच्या आत्महत्येमुळे झुनझुनवाला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (वाचा - Moradabad: मुरादाबाद-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून 2 लाखांची भरपाई जाहीर)

तनिश हा विकास झुनझुनवाला यांचा एकुलता एक मुलगा होता. विकास यांचा सुरतमध्ये कापडाचा व्यवसाय आहे. गेल्या दोन दिवसापासून शाळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तनिश शाळेतही जायला लागला होता. परंतु, तनिशने अभ्यास केला नाही. म्हणून त्याचे वडील त्याला ओरडले होते. परिणामी रागाच्या भरात तनिशने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करून 27 जानेवारीपासून महाराष्ट्रात पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यापूर्वी 23 नोव्हेंबर पासून राज्यात नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत महाराष्ट्रात नववी ते बारावी पर्यंतच्या 21 हजार 287 शाळा सुरू झाल्या आहेत.