The Kapil Sharma मध्ये कोर्टरुम सीन वेळी ड्रिंक करण्यासंदर्भात निर्मात्यांच्या विरोधात FIR दाखल
खरंतर मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात त्यांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
The Kapil Sharma शो चे निर्माते अडचणीत सापडले आहेत. खरंतर मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात त्यांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार या गोष्टीसाठी करण्यात आली आहे की, कोर्टरुमच्या सीन दरम्यान कलाकार ड्रिंक करत होते. कलाकाराने कोर्टाचा अपमान केल्याच्या त्याच्यावर आरोप लगावण्यात आला आहे.(Bappi Lahiri यांचा आवाज COVID 19 मुळे गेल्याच्या बातम्या अफवा; पहा त्यांच्या आवाजातील गाणं Watch Video)
10 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित करण्यात आलेला हा एपिसोड पुन्हा 24 एप्रिल 2021 रोजी पुन्हा टेलिकास्ट करण्यात आला. वकिलांनी दावा केला आहे की, एपिसोडमध्ये असे दाखवले कोर्टरुन सेट मध्ये शूट करताना कलाकाराने असा अभिनय केला की तो ड्रिंक करत आहे. या सीन मुळे त्याने कोर्टाचा अपमान केला आहे.(Kesari चित्रपटातील 'Teri Mitti' या लोकप्रिय गाण्यावर चोरीचा आरोप; जाणून घ्या काय म्हणाले गीतकार Manoj Muntashir)
शिवपुरी येथील वकिलांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी कोर्टाकडून येत्या 1 ऑक्टोंबरला सुनावणी केली जाणार आहे. वकिलांचे असे म्हणणे आहे की, द कपिल शर्मा अत्यंत वाईट शो आहे. यामध्ये महिलांसंदर्भात ही अभद्र कमेंट्स केल्या जातात. एका एपिसोड मध्ये तर स्टेजवर कोर्टरुमचे सेटअप असून त्यात कलाकार सार्वजनिक ठिकाणी दारु पित आहेत. हा तर कोर्टाचा अपमान आहे. त्यामुळेच मी एफआयआर दाखल केल्याचे वकिलांनी म्हटले आहे. हा सर्व वाईट प्रकार थांबला पाहिजे.