Tejashri Pradhan New Look: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा नवीन लुक पहिलात का ? (See Pics )

नुकतेच तेजश्रीने तिचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. ज्या फोटोमध्ये तिचा नविन लुक आणि मोहक हास्य पहायला मिळत आहे.

Tejashri Pradhan (Photo0 Instagram)

'काहीही हां श्री' अस ऐकल की नकळत आपल्या डोळ्यासमोर समोर तेजश्री प्रधान अभी राहते. आपल्या अभिनयाने तेजश्री ने कित्येक प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. खास करुन 'होणार सुन मी या घरची' या मालिकेतून तिला प्रेक्षकांचे जास्त प्रेम मिळाले. तेजश्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतेच तेजश्रीने तिचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. ज्या फोटोमध्ये तिचा नविन लुक आणि मोहक हास्य पहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तेजश्रीने निळ्या रंगाचा गाउन घातला आहे आणि ज्यात ती खुप मनमोहक दिसत आहे. तुम्ही ही पहा तेजश्री ची मनमोहक अदा. (Abhidnya Bhave First Mangalagaur: अभिज्ञा भावे ने 'अशी' साजरी केली तिची पहिली मंगळागौर! )

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝐓𝐞𝐣𝐚𝐬𝐡𝐫𝐢 𝐏𝐫𝐚𝐝𝐡𝐚𝐧 (@tejashripradhan)

तेजश्रीने या गोजिरवाण्या घरात या मालिकेतुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 'होणार सुन मी या घरची' मालिकेत काम करत असताना तेजश्रीचे अभिनेता शशांक केतकरशी सूत जुळले त्यानंतर त्यांनी लग्न ही केले मात्र त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. ('अग्गंबाई सासूबाई' मालिकेनंतर तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की पुन्हा एकत्र; पहा Video )

काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधान लवकरच एका मराठी मालिकेत झळकणार असल्याची माहिती काही सोशल मीडिया पेजनी दिली होती. ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर दिसण्याची शक्यता आहे असे ही सांगण्यात आले होते. मात्र अद्याप  तेजश्री कडून अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.