Zee5 Show Churails Banned in Pakistan: बोल्ड कंटेंटमुळे पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आला झी 5 वरील प्रसिद्ध टीव्ही शो 'चुड़ैल्स'
झी 5 वरील प्रसिद्ध टीव्ही शो 'चुड़ैल्स' वर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Zee5 Show Churails Banned in Pakistan: झी 5 वरील प्रसिद्ध टीव्ही शो 'चुड़ैल्स' वर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली आहे. या शोचा पहिला सीझन पाकिस्तानमध्ये चांगलाचं गाजला होता. त्यानंतर निर्माते त्याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यासाठी तयारीत होते. पण, या शोमध्ये दाखवण्यात आलेल्या बोल्ड कंटेंटमुळे पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. 'चुड़ैल्स' चे निर्माते असीम अब्बास यांनी आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. यावर दु: ख व्यक्त करताना अब्बास म्हणाले की, या शोला जगभरात पसंती होत आहे. परंतु, ज्या ठिकाणी या शोची निर्मिती करण्यात आली, त्याठिकाणी या शोवर बंदी घालण्यात आली आहे.
असीम अब्बास यांनी याविषयी बोलताना सांगितले की, 'हा कार्यक्रम करण्यासाठी बर्याच लोकांनी परिश्रम घेतले आहेत. परंतु, काही लोकांनी नैतिक धोका समजून या कार्यक्रमावर बंदी घातली. कलाकारांचे स्वातंत्र्य थांबविले गेले आहे, जे अतिशय निंदनीय आहे. हा सर्व महिला आणि अल्पसंख्याकांचा पराभव आहे. तसेच पाकिस्तानच्या या सर्व लेखकांचा, दिग्दर्शकांचा आणि तंत्रज्ञांचादेखील हा पराभव आहे. (Bigg Boss 14 Update: बिग बॉस 14 मध्ये निक्की तंबोली आणि सिद्धार्थ शुक्लाचा Hot Rain Dance व्हिडिओ झाला व्हायरल, Watch Video)
'चुड़ैल्स' ही अशी क्राइम थ्रिलर सीरिज होती, जी जिंदगी ओरिजिनल आणि झी 5 ने तयार केली होती. या शोमध्ये बर्याच मजेदार कथा सादर करण्यात आल्या होत्या. ज्यात महिला सबलीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. शोमध्ये एक सीन आहे, ज्यात हिना खुवाजा (Hina Khuwaja) सांगते की, तिने काम मिळवण्यासाठी तिच्यापेक्षा 20 वर्षाने मोठ्या असणाऱ्या बॉसला हँडजॉब दिले. त्यानंतर तिला नोकरी व पदोन्नती मिळाली.
या शोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देणं सुरू केले. यानंतर या शोची बरीच चर्चा झाली. मात्र, आता पाकिस्तानमध्ये या शोवर बंदी घालण्यात आली आहे.