Shweta Tiwari हिच्या ब्रा वरील वादग्रस्त विधानामुळे अभिनेत्रीच्या विरोधात FIR दाखल

कारण तिने 'माझ्या ब्रा ची साइज देव घेतोय' असे वादग्रस्त विधान केले आहे. यामुळेच श्वेता तिवारी हिच्या विरोधात भोपाळ मधील श्यामला हिल्स पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Shweta Tiwari (Photo-Instagram)

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण तिने 'माझ्या ब्रा ची साइज देव घेतोय' असे वादग्रस्त विधान केले आहे. यामुळेच श्वेता तिवारी हिच्या विरोधात भोपाळ मधील श्यामला हिल्स पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्वेता तिवारी हिने अशा प्रकारचे विधान केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा तिच्यावर आरोप लावण्यात आला आहे.(अभिनेत्री Shweta Tiwari च्या 'ब्रा साईज' च्या वक्तव्यावरून नवा वाद; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश)

भोपाळ येथे श्वेता हिची अपकमिंग बेव सीरिजच्या लॉन्चिंगचा इव्हेंट नुकताच पार पडला. यामध्ये तिने मजेत वादग्रस्त विधान केले. श्वेता हिने हसत हसत असे म्हटले की, माझ्या ब्रा ची साइज देव घेत आहे. पाहता पाहता श्वेता हिचे हे विधान तुफान व्हायरल झाले. राजकीय व्यक्तींमध्ये सुद्धा तिच्या या विधानावरुन चर्चा होऊ लागल्या. मध्य प्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी श्वेता हिच्या वादग्रस्त विधानाची निंदा केली. त्यांनी असे म्हटले की, तिच्या विरोधात कारवाई करावी.

Tweet:

श्वेता तिवारी हिची सीरिज 'शो स्टॉपर- मीट द ब्रा फिटर' च्या लॉन्च इव्हेंटचे होस्ट सलिल आचार्य यांनी अभिनेत्रीच्या विधानाचे सत्य सांगितले. त्यांनी एक व्हिडिओ जाहीर करत ती नेमके कशा संदर्भात बोलले हे स्पष्ट केले आहे. सलिल यांनी व्हिडिओत असे म्हटले की, ज्या क्लिपवरुन वाद होत आहे त्यामध्ये थोडा गैरसमज झाला आहे. मी प्रश्न विचारला होता. माझ्या समोर सौरभ राज जैन बसले होते. त्यांनी काही माइथॉलॉजिकल शो सुद्धा केले आहेत. मी तिला प्रश्न केला की., देव ते थेट ब्रा फिटरच्या भुमिकेवरुन. त्यानंतर श्वेता हिने उत्तर दिले. तर श्वेता हिचे विधान संदर्भासह समजून घ्यावे. मात्र तो तोडून मोडून व्हायरल करु नये.(FIR Against Google CEO: गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या विरोधात प्रोड्यूसर-डायरेक्टर सुनील दर्शन यांची एफआयआर)

श्वेता तिवारी हिच्या या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत रोहित रॉय, दिगांगना सुर्यवंशी, सौरभ जैन, कंवलजीत झळकणार आहेत. भोपाळ येथे ही सीरिज शूट होणार आहे. परंतु शुटिंग सुरु होण्यापूर्वीच हा वाद निर्माण झाला आहे.. या प्रकरणावर अद्याप श्वेता तिवारी हिने कोणतेही विधान केलेले नाही.