
DGMO Is Virat Kohli Fan: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 12 मे (सोमवार) रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय कोहलीने इंस्टाग्रामवर भावनिक पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली. त्यानंतर, पत्रकार परिषदेत, डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई (Lieutenant General Rajiv Ghai) यांनी कठोर आणि सूक्ष्म इशारा देऊन भारताच्या संरक्षण यंत्रणेच्या ताकदीचा संदेश दिला. ते म्हणाले, "आमच्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सला लक्ष्य करणे अत्यंत कठीण आहे."." ते पुढे म्हणाले, "मी पाहिलं की विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो माझा एक आवडता खेळाडू आहे.
भारताची सुरक्षा व्यवस्था बहुपदरी
याच अनुषंगाने त्यांनी 1970 च्या दशकातील Ashes मालिकेची त्यांनी आठवण करून दिली. तेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यात दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडचा संपूर्ण डाव उद्ध्वस्त केला होता. त्या वेळी ऑस्ट्रेलियन संघाकडून एक वाक्य प्रसिद्ध झालं होतं – "Ashes to ashes, dust to dust, if Thommo don't get ya, Lillee must." याचा संदर्भ देत जनरल घई म्हणाले, "जर तुम्ही या सुरक्षा व्यवस्थेतील सर्व स्तर पार केले, तरी या ग्रिड सिस्टीममधील एक तरी स्तर तुम्हाला निश्चितपणे रोखेल." त्यांनी सूचित केलं की भारताची सुरक्षा व्यवस्था बहुपदरी असून, प्रत्येक स्तरावर जबरदस्त तयारी आहे.
#WATCH | Delhi | DGMO Lieutenant General Rajiv Ghai says, "Targetting our airfields and logistics is way too tough... I saw that Virat Kohli has just retired from test cricket; he is one of my favourites. In the 1970s, during the Ashes between Australia and England, two… pic.twitter.com/B3egs6IeOA
— ANI (@ANI) May 12, 2025
विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीवर एक नजर
टीम इंडियाचा घातक फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत 123 सामन्यांच्या 210 डावांमध्ये 46.85 च्या उत्कृष्ट सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. दरम्यान, विराट कोहलीचा सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 धावा आहे. विराट कोहलीच्या बॅटने 30 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहलीने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. भारतात विराट कोहलीपेक्षा जास्त कसोटी धावा फक्त सचिन तेंडुलकर (15,921), राहुल द्रविड (13,265) आणि सुनील गावस्कर (10,122) यांनी केल्या आहेत.