अभिनेत्री Shweta Tiwari च्या 'ब्रा साईज' च्या वक्तव्यावरून नवा वाद; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
Shweta Tiwari (Photo-Instagram)

छोट्या पडद्यानंतर बॉलीवूडकडे वळलेली श्वेता तिवारी (Shweta Tiwari) अनेकदा तिचे फोटो आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. आपल्या कामगिरीच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी श्वेता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी अभिनेत्री तिच्या एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडली आहे. श्वेता सध्या भोपाळमध्ये आहे. फॅशनशी संबंधित वेब सीरिजच्या एका कार्यक्रमासाठी ती स्टारकास्ट आणि प्रोडक्शन टीमसोबत भोपाळला पोहोचली होती.

या वेबसिरीजच्या प्रमोशनदरम्यान श्वेताने वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. संभाषणादरम्यान श्वेता म्हणाली की, ‘देव माझ्या ब्राची साईज (Bra Size) घेत आहे.’ हे वाक्य बोलल्यानंतर ती हसायला लागते. श्वेताचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. श्वेताचे हे वाक्य लोकांना खटकले आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की श्वेताने असे वक्तव्य करून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे श्वेता अडचणीत आली आहे. अभिनेत्रीच्या या वक्तव्याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ.नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, ‘अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळमध्ये केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. मी तो व्हिडीओ पाहिला आणि त्याची मी निंदा करतो. मी भोपाळचे पोलीस आयुक्त मकरंद देउस्कर यांना वस्तुस्थिती आणि संदर्भ तपासण्याचे आणि 24  तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल.’ (हेही वाचा: Shweta Tiwari PhotoShoot: श्वेता तिवारींचा ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहुन चाहतेही घायाळ)

श्वेता तिवारी शेवटचे सोनी टीव्हीच्या 'मेरे डॅड की दुल्हन' या शोमध्ये दिसली होती. टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'कसौटी जिंदगी की'मधून तिने करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून टीव्ही विश्वात तिला ‘प्रेरणा’ या नावाने ओळखले जाते. श्वेता तिवारी 'बिग बॉस 4' ची विजेती देखील आहे तसेच 'खतरों के खिलाडी 11' मध्येही ती दिसली होती.