Apurva Nemlekar Bold Photos: अपूर्वा नेमळेकर च्या हॉट अदांनी सोशल मीडियावर लावली आग; पहा शेवंताचा बोल्ड अवतार
अपूर्वाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत: चे बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अपूर्वाच्या चाहत्यांनी या फोटोजना लाईक तसेच कमेन्ट केल्या आहेत.
Apurva Nemlekar Bold Photos: 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या (Apurva Nemlekar) हॉट अदांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अपूर्वाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत: चे बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अपूर्वाच्या चाहत्यांनी या फोटोजना लाईक तसेच कमेन्ट केल्या आहेत.
या फोटोमध्ये अपूर्वा खूपचं सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचे वेस्टर्न वेअर घातलं आहे. या पोस्टला तिने 'ड्रेसिंगचा आनंद एक कला आहे,' असं कॅप्शन दिलं आहे. शेवंताचा हा बोल्ड अंदाज पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. (हेही वाचा -Rasika Sunil Hot Photo: शनाया फेम रसिका सुनील चा स्विमिंग पुल मधील 'बोल्ड' लूक पाहून चाहते झाले घायाळ)
रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंताचं पात्र खूपचं गाजलं. मालिकेतील तिच्या अभिनयामुळे शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर प्रेक्षकांच्या आवडीची बनवली. अपूर्वा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी स्वत: चे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. या फोटोंना सोशल मीडियावर चांगली पसंती मिळते.