स्वप्नील जोशी ला उत्तर रामायणमध्ये 'कुश' ची भूमिका कशी मिळाली? त्याच्याकडूनच 'इथे' ऐका सारे किस्से आणि खास गोष्टी (Watch Video)

अंदाजे 10 मे पर्यंत ही मालिका दाखवली जाणार असून त्यामध्ये आता लव-कुशची कहाणी रंगणार आहे.

Swwapnil Joshi As KUSH | Photo Credits: Twitter

सध्या लॉकडाऊनमध्ये अडकलेले भारतीय दूरदर्शनवर पुन्हा रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेला उदंड प्रतिसाद देत आहे. 1887-88 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झालेली 'रामायण' मालिका आताही तितकीच हीट ठरली. सध्या रामायणपाठोपाठ उत्तर रामायणचे प्रसारण पुन्हा सुरू झाले आहे. आणि मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत असलेला अभिनेता स्वप्नील जोशी या मालिकेत 'कुश' ची भूमिका साकारत आहे. सध्याच्या तरूणाईला स्वप्नील जोशी बालवयातील गोंडस अंदाज भावत आहे त्यामुळे त्याला ही भूमिका कशी मिळाली ते त्याचे मालिकेतील अनुभव अशा एक ना अनेक प्रश्नांचा स्वप्नीलवर भडीमार होत आहे. त्यामुळे खास युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून आता स्वप्नील जोशी त्याचे 'उत्तर रामायणा'तील अनुभव सांगणार आहे. आज त्याने 'कुश' ची भुमिका कशी मिळाली? आणि त्यामागील पार्श्वभूमीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'पिल्लू टीव्ही' या त्याच्या खास युट्युब चॅनलच्या माध्यमातून तो आता रसिकांसमोर काही जुन्या गोष्टी शेअर करणार आहे.  'कुश' साकारणार्‍या मराठमोळ्या 'स्वप्नील जोशी' ने Nostalgic होत ट्वीट केला सुपरक्युट फोटो

स्वप्नील जोशी ट्वीट

स्वप्नीलने जुन्या आठवणींना उजाळा देत रामायण मालिकेचा तो देखील चाहता होता. जेव्हा रामायण मालिका संपली तेव्हा आता पुढे काय? हा प्रश्न त्याच्याही मनात आला होता. त्यादरम्यान उत्तर रामायणाची तयारी सुरू झाली होती. गणेशोत्सवाच्या काळात त्यावेळी गिरगाव मध्ये राहणार्‍या स्वप्नील जोशीने रामायणावर आधारितच एका नाटुकलीमध्ये काम केलं होतं. कर्म धर्म सहयोगाने त्यावेळेस रामायण मालिकेत काम करणार्‍या अभिनेते विलास राज यांनी स्वप्नीलचं काम पाहिलं. त्यांनी स्वतः स्वप्नीलचं कौतुक करत त्याचा फोटो कुटुंबीयांकडून घेतला. ते फोटो का घेऊन गेले होते? रामानंद सागर यांच्याकडून फोन आल्यानंतर नेमका काय किस्सा झाला? याची उत्तरं देखील स्वप्नील येत्या काही दिवसात देणार आहे.

अक्षय कुमार ची मुंबई पोलिसांना २ कोटींची मदत ; CP परमवीर सिंह यांनी मानले आभार : Watch Video

सध्या नियमित रात्री 9 वाजता उत्तर रामायण मालिकेचे प्रसारण केले जाते. अंदाजे 10 मे पर्यंत ही मालिका दाखवली जाणार असून त्यामध्ये आता लव-कुशची कहाणी रंगणार आहे.