Miss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon बद्दल या खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
तर थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती ठरली. नव्या विश्व सुंदरीविषयी जाणून घेऊया काही खास गोष्टी...
काल चीनच्या सान्या शहरात मिस वर्ल्ड (Miss World) स्पर्धेत ‘मिस वर्ल्ड 2018’चा किताबाचा मान व्हेनेसा पोन्स डी लिऑन (Vanessa Ponce De Leon) हिने पटकावला. गेल्या वर्षीची मिस वर्ल्ड ठरलेल्या भारताच्या मानुषी छिल्लरने (Manushi Chillar) व्हेनेसाला विश्व सुंदरीचा ताज घातला. या स्पर्धेत मिस इंडिया अनुकृति वास (Anukreethy Vas) टॉप 30 मध्ये दाखल झाली होती. मात्र टॉप 12 मध्ये ती आपले स्थान निश्चित करु शकली नाही. Miss World 2018: आज जगाला मिळणार नवी विश्व सुंदरी; Anukreethy Vas कडे भारतीयांचे लक्ष