बोल्ड अंदाजात दिसणारी संजय जाधवची 'लकी' अभिनेत्री Deepti Sati नेमकी कोण?
मॉडलिंग क्षेत्रापासून करियरला सुरूवात केलेल्या दीप्ती सतीचं करियर कसं सुरू झालं?
संजय जाधव (Sanjay Jadhav) दिगदर्शित आगामी सिनेमा 'लकी' (Luckee) चा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. सिनेमाच्या पोस्टरपासून दमदार ट्रेलरपर्यंत सार्याचीच सध्या सोशल मीडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. संजय जाधवचा प्रत्येक सिनेमा खास असतो. 'लकी'(Luckee) या आगामी सिनेमामधून संजय जाधव अभय महाजन (Abhay Mahajan) आणि दीप्ती सती (Deepti Sati) ही नवी जोडी घेऊन येत आहे. या दोन्ही कलाकारांचा 'लकी' हा मुख्य भूमिकेतील पहिला सिनेमा आहे. अभय महाजन हा वेब सीरिजद्वारा रसिकांच्या भेटीला अनेकदा आला आहे. मात्र दीप्ती ही मराठी रसिकांना पहिल्यांदाच पहायला मिळणार आहे. Luckee Trailer: अभय महाजन आणि दीप्ती सती यांच्यामधील धम्माल कॉमेडी आणि रोमॅंटिक सिनेमा 'लकी' चा ट्रेलर
दीप्ती सती कोण ?
- दीप्ती सती ही अमराठी कलाकार आहे. 'लकी' हा दीप्तीचा पहिला मराठी सिनेमा आहे. दीप्तीचे वडील नैनिताल तर आई केरळची आहे. मात्र दीप्तीचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाले आहे.
- दीप्ती सतीने मराठीपूर्वी केरळ, मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. हिंदीमध्ये 'Only for singles' ही वेब सीरिज तिने केली आहे.
- लकी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दीप्ती सतीचा बोल्ड अंदाज पहायला मिळाला आहे. या सिनेमामध्ये दीप्ती सती 'बिकनी' मध्ये दिसणार आहे. यापूर्वी मराठी सिनेमामध्ये सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर अशा मोजक्याच अभिनेत्रींनी बिकनीमध्ये कॅमेर्यासमोर येण्याचं धाडस केलं आहे.
- अभिनेत्री असली तरीही दीप्तीच्या करियरची सुरूवात मॉडलिंगद्वारा झाली आहे. दीप्ती सती Femina Miss India 2014 स्पर्धेमध्ये टॉप 10 मध्ये होती. Miss Kerala,Navy Queen 2013, Indian Princess 2014 या स्पर्धेमध्ये ती सहभागी झाली होती. Indian Princess 2014
ची दीप्ती पहिली रनर अप होती. Femina Miss Kerala 2012-13 विजेती आहे.
- दीप्ती कथ्थक आणि भरतनाट्यम अशा पारंपारिक नृत्यकलेमध्ये पारंगत आहे. लहानपणापासून तिने या कलेचे शिक्षण घेतले आहे.
संजय जाधवच्या आगामी सिनेमामधून दीप्ती मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे. 7 फेब्रुवारी 2019 रोजी हा सिनेमा रीलिज होणार आहे. त्यामुळे अभय आणि दीप्तीचा रोमान्स, कॉमेडीचा तडका बॉक्सऑफिसवर काय धमाका करतो? हे पाहणं उत्सुकतेचे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)