डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल ट्विट केल्यावर माधुरी दीक्षित ट्रोल
श्रीराम लागू यांचे स्मरण करत ट्विट केले. या ट्विटमध्ये माधुरीने म्हटले की, 'अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाबाबत इतक्यातच समजले. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ'. माधुरीच्या या ट्विटवर काही युजर्सनी संवेदना व्यक्त केल्या. तर काहींनी तिच्या या पोस्टवरुन तिला चांगलेच ट्रोल केले.
मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने खास दबदबा निर्माण करणारे अभिनेत डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) यांचे निधन झाले. डॉ. लागू यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही धक्का बसला. डॉ. लागू यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक मान्यवर कलाकार आणि मान्यवरांचा समावेश आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिनेही डॉ. लागू यांच्या निधनाची बातमी कळताच ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, माधुरीने हे ट्विट बऱ्याच उशीराने केले. त्यामुळे हा प्रकार डॉ. लागू आणि माधुरीच्या चाहत्यांनाही फारसा आवडला नाही. त्यांनी तिला ट्रोल केले.
माधुरी दीक्षित हिने अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे स्मरण करत ट्विट केले. या ट्विटमध्ये माधुरीने म्हटले की, 'अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाबाबत इतक्यातच समजले. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ'. माधुरीच्या या ट्विटवर काही युजर्सनी संवेदना व्यक्त केल्या. तर काहींनी तिच्या या पोस्टवरुन तिला चांगलेच ट्रोल केले. एका युजर्सने म्हटले की, '3 दिन बाद', दुसऱ्या एका युजर्सने म्हटले की, 'कुछ तो सुनाई दिया'. काही युजर्स तिला उद्देशून म्हणाले, 'तू (माधूरी) खूपच स्लो आहे.' (हेही वाचा, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन; मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीचे चालतेबोलते विद्यापीठ हरपले)
माधुरी दीक्षित ट्रोल
दरम्यान, श्रीराम लागू हे गेले काही दिवस प्रकृतीअस्वास्त्याने त्रस्त होते. त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 17 डिसेंबर 2019 रोजी त्यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.
युजर्सच्या प्रतिक्रिया
ट्विट
डॉ. श्रीराम लागू यांनी अग्निपंख (रावसाहेब), अँटिगनी (क्रेयाँ), आकाश पेलताना (दाजीसाहेब) ,आत्मकथा (राजाध्यक्ष), आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ), आधे अधुरे (यात ४ भूमिका केल्या आहेत.), इथे ओशाळला मृत्यू (संभाजी), उद्याचा संसार (विश्राम), उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर), एकच प्याला (सुधाकर), एक होती राणी (जनरल भंडारी), कन्यादान (नाथ देवळालीकर), कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे), काचेचा चंद्र (बाबुराव) किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री), खून पहावा करून (आप्पा), गार्बो (पॅन्सी), गिधाडे (रमाकांत), गुरु महाराज गुरू (गुरुनाथ), जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा), डॉक्टर हुद्दार (हुद्दार), नटसम्राट (बेलवलकर) यांसह अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. तर सिंहासन, सामना, पिंजरा, आपली माणसं, गुपचूप गुपचूप ,भिंगरी, मुक्ता हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.