Baba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)
तर सध्याच्या धकाधकीच्या जीवनातसुद्धा बाबा आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. परंतु फक्त मुलाच्या सुखासाठी प्रयत्न करत असताना त्यामध्ये किती अडथळे येतात याचे दु:ख कधीच ते बाळगत नाही किंवा व्यक्तसुद्धा करुन दाखवत नाहीत.
आपल्या मुलाला सर्व गोष्टी मिळण्यासाठी बाबा नेहमीच धडपड करताना दिसून येतात. तर सध्याच्या धकाधकीच्या जीवनातसुद्धा बाबा आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. परंतु फक्त मुलाच्या सुखासाठी प्रयत्न करत असताना त्यामध्ये किती अडथळे येतात याचे दु:ख कधीच ते बाळगत नाही किंवा व्यक्तसुद्धा करुन दाखवत नाहीत. बाबा फक्त त्यांच्या व्याकुळ भावना एका मुक्या शब्दांत व्यक्त करतात. तर अशाच मुक्या शब्दांत आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' (Baba) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या कथा खासकरुन वडील आणि मुलाच्या नात्याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. यामध्ये वडील आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसून येतात. मात्र कथेत अशी घटना घडते की उंच झोपाळ्याच्या दुर्घटनेनंतर मुलगा एका अन्य परिवाराचा असल्याचा दावा केला जातो. त्यानंतर हा मुकबधिर मुलगा नक्की कोणाचा यावरुन कथापुढे चालू होते. तर वडील आपला मुलगा परत मिळावा म्हणून व्याकुळतेने आपल्या भावना इतरांसमोर मांडताना दिसून येतात. परंतु भावनेला भाषा नसते असे म्हणत नक्की मुलगा कोणाचा आणि कशा पद्धतीने ते सिद्ध होते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.(Baba Teaser: वडील आणि मुलातील नात्यातील मुक्या शब्दांना भावनेची जोड देणारा 'बाबा' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित)
तर बॉलीवूडमधील आघाडीचा सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. निर्माता म्हणून ‘बाबा’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली अशोक आणि आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’बरोबर केली आहे. ‘ब्ल्यू मस्टँगने याआधी ‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.