Birth Anniversary: एका दिवसात 21 कन्नड गाण्यांचे रेकॉर्डिंग करणारे एसपी बालसुब्रमण्यम कसे बनले सलमान खानचा आवाज

मोहम्मद रफीचे ते इतके मोठे चाहते होते की त्यांना ऐकल्यानंतर ते गायकीच्या दूनियेत आले. त्यांच्या जीवनाची आणि संगीतमय प्रवासाची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे.

S. P Balasubramanyam (Photo Credit - Twitter)

एसपी बालसुब्रमण्यम (Sripathi Panditaradhyula Balasubrahmanyam) यांना एसपीबी (SPB) किंवा बाळू या नावाने हाक मारली जायची. तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये गाणाऱ्या या महान गायकाचा जन्म 4 जून 1946 रोजी नेल्लोर येथे झाला. हिंदी विरुद्ध दक्षिण भारतीय भाषा असा वाद सुरू असताना बालसुब्रमण्यम यांची खूप आठवण येते. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत समान प्रवेश आणि फॅन फॉलोइंग असलेले एसपी उघडपणे सांगत असत की, त्यांना हिंदी गाण्यांमधून कशी गाण्याची प्रेरणा मिळाली. मोहम्मद रफीचे ते इतके मोठे चाहते होते की त्यांना ऐकल्यानंतर ते गायकीच्या दूनियेत आले. त्यांच्या जीवनाची आणि संगीतमय प्रवासाची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे.

दक्षिण भारतात आपला ठसा उमटवणाऱ्या बालसुब्रमण्यम यांनी 1981 मध्ये आलेल्या 'एक दुजे के लिए' या हिंदी चित्रपटासाठी पहिल्यांदा हिंदीत गाणे गायले होते आणि त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तोही एका नव्हे तर 4 वेगवेगळ्या भाषांमध्ये. यानंतर एक वेळ अशी आली की बालसुब्रमण्यम हे सलमान खानचा आवाज बनले होते.

बालसुब्रमण्यम यांनी सलमानच्या गाण्यांना दिला आवाज

सलमान खान जेव्हा नवीन चित्रपटांमध्ये आला तेव्हा अनेक वर्षांपासून एसपी बालसुब्रमण्यमला दबंग खानचा आवाज समजला जात होता. 'मैने प्यार किया', 'साजन', 'हम आपके है कौन' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या मधुर गाण्यांना बालसुब्रमण्यम आवाज दिला होता. एस पी बालसुब्रमण्यम यांचे गायन अप्रतिम होते की त्यांचा आवाज जितका सलमान खानवर होता तितकाच दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतवरही होता

एका दिवसात 21 कन्नड गाणी गायली

बालसुब्रमण्यम सुमारे 74 वर्षे सक्रिय राहिले. बालसुब्रमण्यम यांनी एका दिवसात 21 कन्नड गाणी गाऊन विक्रम केला होता, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. दक्षिणेपासून हिंदीपर्यंत इतक्या चित्रपटात गाणी गायली की, असे विचारल्यावर बालसुब्रमण्यम म्हणाले की मी किती गाणी गायली आहेत हे मोजायला विसरलो. (हे देखील वाचा: IIFA Awards 2022: दुबईमध्ये 2 जून ते 4 जून या दरम्यान होणार यंदाचा आयफा अवॉर्ड्स 2022; जाणून घ्या कोण करणार परफॉर्मन्स)

बालसुब्रमण्यम यांच्या आवाजाने अनेक गाणी केली अजरामर

'तेरे मेरे बीच में कैसे है ये बंधन अंजाना', 'ओ मारिया', 'दिल दीवाना', 'कबूतर जा जा', 'दीदी तेरा देवर दिवाना', 'आज शाम होने आई', 'मेरे रंग में रंगने वाली' या सारखी गाणी आपल्या आवाजाने हिट करणाऱ्या बालसुब्रमण्यम यांचे योगदान भारतीय संगीत कधीही विसरणार नाही. या महान गायकाचे 25 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले.