Katrina Kaif सोबत 'रोका' झाल्याच्या बातमीवर Vicky Kaushal ची प्रतिक्रिया, म्हणाला- 'लवकरच साखरपुडा करणार'

न्यूज वेबसाइटनुसार, दोघेही राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे

Vicky Kaushal & Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या चित्रपटांसोबतच रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. जरी दोन्ही कलाकारांनी अद्याप यावर उघडपणे काहीही भाष्य केले नसले तरी, माध्यमांमध्ये अशा बातम्या फिरत आहेत. याआधी या दोघांचा साखरपुडा झाल्याचीही बातमी आली होती, मात्र कतरिनाच्या टीमने हे वृत्त फेटाळले होते. आता विकी त्याच्या 'सरदार उधम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना त्याचा व कतरिनाचा ‘रोका’ झाल्याची बातमी समोर येत आहे.

यावर विकीची प्रतिक्रिया समोर आली आहे, तो म्हणाला- ‘ही केवळ प्रसारमाध्यमांमुळे पसरलेली अफवा आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण एंगेजमेंटही करू असे त्याने सांगितले. ई-टाइम्सशी बोलताना विकी म्हणाला की, 'अशा बातम्या मित्रांनी पसरवल्या आहेत (हसत), परंतु मी लवकरच साखरपुडा करेन. त्याचीही चांगली वेळ येईलच.’

याआधी विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघे अंबानींच्या होळी पार्टीत एकत्र एन्जॉय करताना दिसले होते, त्यानंतर यांच्यातील अफेअरच्या बातमीला पहिल्यांदा हवा मिळाली. त्यानंतर, कधी विकी कतरिनाच्या घरी जाताना दिसला तर कधी दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र पाहिले गेले. कतरिना शुक्रवारी 'सरदार उधम'च्या स्क्रीनिंगलाही पोहोचली होती. सरदार उधम पाहिल्यानंतर कतरिना कैफने सोशल मीडियावर चित्रपटाचे, दिग्दर्शकाचे व विकी कौशलचे कौतुक केले होते. (हेही वाचा: Gadar 2: Ameesha Patel आणि Sunny Deol 'गदर 2' साठी पुन्हा एकत्र; समोर आले चित्रपटाचे मोशन पोस्टर)

दरम्यान, माध्यमांमध्ये अशाही बातम्या होत्या की, विकी कौशल आणि कतरिना कैफ या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करू शकतात. न्यूज वेबसाइटनुसार, दोघेही राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे. कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही, परंतु दोघांनी हो गोष्ट कधी नाकारलीही नाही. अलीकडेच हर्षवर्धनने स्पष्ट केले की कतरिना आणि विकी एकमेकांना डेट करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif