Sushant Singh Rajput Death Case: सुशांतची बहिण प्रियंका, मितू यांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यासाठी रिया चक्रवर्ती हिची बॉम्बे हायकोर्टाला विनंती

रिया चक्रवर्ती (Image Credit: Yogen Shah)

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी अटक केल्यानंतर दीड महिन्यांने तिला जामिन देण्यात आला आहे. तर 7 ऑक्टोंबरला रिया हिचा जामिन मिळाला होता. तर अद्याप सुशांत सिंह राजपूर याच्या मृत्यूप्ररणी सीबीआयकडून तपास केला जात आहे. पण रिया हिने सुशांत याची बहीण प्रियंका सिंह आणि मितू सिंह यांनी वांद्रे पोलिसात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द केलेल्या याचिकेचा विरोध केला आहे. रिया हिने असे म्हटले आहे की, जी तक्रार तिच्या विरोधात केली आहे. त्याचा पूर्णपणे तपास करण्यात यावा. कारण ही औषधे घेतल्यानंतर एका आठवड्यांनी सुशांत याचा मृत्यू झाला आहे.(Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याचे प्रसारमाध्यमांतील वृत्त चुकीचे; CBI ने दिले 'हे' स्पष्टीकरण)

बॉम्बे हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात रिया हिने असे म्हटले आहे की, सुशांतची बहीण प्रियंका आणि राम मनोहर लोहिया दिल्लाचे डॉ. तरुण कुमार कोणत्याही सल्ल्याव्यतिरिक्त अवैध पद्धतीने मानसिक त्रासासंबंधित औषधे देत होते. तसेच असे ही म्हटले आहे की, सुशांत याची बहीण प्रियंका हिने 8 जूला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नॅक्सिटो, लिब्रियम आणि लोनजेप एमडी सारखी औषधे घेण्यास सांगितले होते. NDPS अॅक्ट अंतर्गत ही तिन्ही औषधे सायको-ट्रॉपिक सबस्टेंस पासून तयार केली जातात.(Sushant Singh Rajput च्या मृत्यूला चार महिने पूर्ण; बहिण श्वेता सिंह कीर्तीने डिलीट केले आपले ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट्स)

रिया हिने असा दावा केला आहे की, हे आरोप गंभीर प्रकृती संदर्भातील आहेत. यासाठी तपास यंत्रणेला पुरेसा वेळ देण्याची आवश्यकता आहे. याच कारणास्तव FIR रद्द करण्यासाठी याचिका फेटाळून लावावी. बॉम्बे हायकोर्टाचे न्यायाधीश एसएस शिंदे आणि एमएस कार्णिक यांच्या खंडपीठासमोर प्रियंका आणि मितू यांच्या याचिकेवर येत्या 4 नोव्हेंबरला सुनावणी पार पडणार आहे.