Rocky Aur Rani Ki Prem Kahani: रॉकी और राणी की प्रेम कहाणी चित्रपटाचा टीझर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला, फस्ट लुक पाहून चाहते खुश

प्रेक्षकांना ह्या चित्रपटाचा टीझर पाहण्यास चांगलीच हूरहूर लागली आहे, करण जोहर ह्या चित्रपटाचा निर्माता आहे.

aliya and ranveer -instagram file
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: गल्लिबॉय चित्रपटामुळे सुप्रसिध्द झालेली बॉलिवूड जोडी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग पुन्हा एका चित्रपटात काम करणार आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट  रॉकी और राणी की प्रेम कहाणी ह्या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहे. रणवीर सिंगने इंस्टाग्रामच्या अंकाउट वरुन आगामी चित्रपट रॉकी और राणी की प्रेम कहाणी ह्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. रॉकी और राणी की प्रेम कहाणी ह्या चित्रपटात सर्वांची लाडकी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
20 जून म्हणजे उद्या ह्या चित्रपटाचे टीझर लॉंच होणारआहे. आलिया आणि रणवीर सिंग यांचा फस्ट लुक सुद्दा सोशल मीडियावर आले आहे. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे निर्माते  करण जोहर यांनी सांगितले आहे.
 चित्रपटातील कलाकारांचा फस्ट लुक सोशल मीडियावर आला असताना, चाहत्यांना चांगली ह्या चित्रपटाची हुरहुर लागली आहे. ह्या पोस्टरवर रणवीर सिंग आणि आलिया भट्टला पाहून चाहते खुश झाले आहेत. ह्या चित्रपटाचा टीझर उद्या रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

हा चित्रपट 28 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती करण जोहरनी दिली. शबाना आझमी, जया बच्चन, धमेंद्र यांसारखे बडे कलाकार सुद्दा ह्या चित्रपटाता भुमिका गाजवणार आहे. रणवीर आणि आलियाच्या ह्या हटके लुकमुळे चाहते फार खुश झाले आहे.