Coronavirus: देशात लॉकडाऊन असताना लोकांनी केला दुधाच्या टँकरमधून प्रवास; रितेश देशमुख ने शेअर केला सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ: Watch Video

या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 600 हून अधिक झाली आहे. तसेच राज्यात 130 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसचं संकट एवढं गडद असतानादेखील लोक त्याला गांभिर्याने घेत नाहीत. देशात लॉकडाऊन असताना लोक रस्त्यावर येत आहेत. तसेच अनेकजण सरकारच्या सुचनांचे उल्लंघन करून अवैध मार्गाने प्रवास करत आहेत.

लॉकडाऊन काळात नागरिकांचा टँकरने प्रवास (PC - Twitter)

Coronavirus: देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 600 हून अधिक झाली आहे. तसेच राज्यात 130 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसचं संकट एवढं गडद असतानादेखील लोक त्याला गांभिर्याने घेत नाहीत. देशात लॉकडाऊन असताना लोक रस्त्यावर येत आहेत. तसेच अनेकजण सरकारच्या सुचनांचे उल्लंघन करून अवैध मार्गाने प्रवास करत आहेत.

बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आपल्या ट्विटर हँडलवरून दुधाच्या टँकरच्या (Milk Van) आतमध्ये लपून प्रवास करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. रितेशने या मासिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी ऋतिक रोशन, कपिल शर्मासह कलाकार मंडळी पुढे सरसावली)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, लोक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. देशात लॉकडाऊन असतानादेखील लोक सरकारच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करत आहेत. तसेच दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे लॉकडाऊन काळात प्रचंड हाल होताना दिसत आहेत. हे लोक पायपीट करत हजारो किलोमीटरचा प्रवास करत आहेत.



संबंधित बातम्या

Babar Azam Milestone: बाबर आझमने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत सर्वात जलद 11,000 धावा करणारा खेळाडू ठरला

SA Beat PAK 2nd T20I 2024 Scorecard: दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी, रीझा हेंड्रिक्सने झळकावले शतक

Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरणानंतर खून; संतप्त स्थानिकांचे अहमदनगर अहमदपूर महामार्गावर रस्ता रोको

PAK vs SA 1st T20I 2024 Preview: पहिल्या T20 मध्ये पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून कडवी टक्कर द्यावी लागणार, हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, सामन्यापूर्वी स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून