पाकिस्तान कडून भारतीय चित्रपटांच्या CD वर बंदी, गायिका आशा भोसले यांनी ट्वीटच्या माध्यमातून मांडले मत
त्यानंतर आता भारतीय चित्रपटांच्या CD वर बंदी घालण्यात आली आहे.
मोदी सरकारने जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधूल कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) संतापला आहे. या प्रकारानंतर तणतणलेल्या पाकिस्तानने भारतासोबत सर्व संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला. प्रथम भारतीय चित्रपट, जाहिरातींवर पाकिस्तानात बंदी घातली. त्यानंतर आता भारतीय चित्रपटांच्या CD वर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकावर आता प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांनी ट्वीट करत याबद्दल त्यांचे मत मांडले आहे.
आशा भोसले यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, सोन्याकडे दुर्लक्ष करा. पण भारतीय चित्रपटांच्या सीडीवर लक्ष केंद्रीत केल्यास त्याची मागणी अधिक वाढेल. आशा भोसले यांच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
आशा भोसले ट्वीट:
तसेच भारतीय चित्रपटांच्या सीडींची विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करणे सुरु केले आहे‘, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनी सांगितले आहे.(कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तानचा जळफळाट, भारतीय जाहिरातींवर घातली बंदी)
नेटकऱ्यांच्या ट्वीटरवरील प्रतिक्रिया:
गुरुवारी पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्यलेटरी अथॉरिटी (PEMRA) यांनी भारतीय जाहिरातींवर बंदी घातली. त्यानंतर याबद्दल एक पत्रक जाहीर केले असून त्यामध्ये हा मुद्दा मांडला आहे. त्यानुसार जाहीर केलेल्या पत्रकात भारतीय कलाकारांना पाहून पाकिस्तानी नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानने समझोता एक्सप्रेससुद्धा बंद केली आहे.