Multiplexes, Theatres to Open in Maharashtra: राज्य सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात उद्यापासून सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स उघडण्यास परवानगी

आता त्यामध्ये वेळोवेळी शिथिलता आणत गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या बाबतील महाराष्ट्र हे सर्वात प्रभावित राज्य असल्याने राज्य सरकार गोष्टी सुरु करण्याच्या बाबतीत सावध पावले टाकत आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले होते. आता त्यामध्ये वेळोवेळी शिथिलता आणत गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या बाबतील महाराष्ट्र हे सर्वात प्रभावित राज्य असल्याने राज्य सरकार गोष्टी सुरु करण्याच्या बाबतीत सावध पावले टाकत आहे. याआधी केंद्र सरकारने चित्रपटगृहे 15 ऑक्टोबर सुरु करण्यास परवानगी दिली होती. आता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील चित्रपटगृहे (Cinema Halls), मल्टिप्लेक्स (Multiplexes) आणि नाट्यगृहे (Theatres) उद्यापासून, 5 नोव्हेंबर सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र सरकार सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स सुरु करण्यास परवानगी देत आहे. एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के जागांच्या वापरासह ही परवानगी दिली गेली आहे.’ यासोबतच राज्य सरकारने महाराष्ट्रात 5 नोव्हेंबरपासून कंटेटमेंट झोन बाहेर, अंतर्गत खेळ आणि योगा संस्थांना परवानगी दिली आहे. सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स देखील कंटेटमेंट झोन बाहेर सुरु होणार आहेत.

एएनआय ट्वीट -

गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृहे. नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात जिम सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर चित्रपटगृहेही सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली होती. याआधी याबाबत राज्य सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Cultural Affairs Minister Amit Deshmukh) यांच्यासमवे सिनेमा मालक आणि प्रदर्शक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांची बैठक पार पडली होती. आता राज्य सरकारने कोरोना नियमांचे पालन करून 50 टक्के आसन क्षमतेसह चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. (हेही वाचा: Diwali Bonus 2020: मुंबई महानगरपालिकेकडून BEST कर्मचार्‍यांना यंदा 10,100 रूपये बोनस जाहीर)

'चित्रपट गृहे उघडल्यानंतर प्रदर्शनासाठी आम्हाला नवीन हिंदी चित्रपट मिळाले नाहीत, तर आम्ही दक्षिण चित्रपटांव्यतिरिक्त मराठी, बंगाली, भोजपुरी, पंजाबी आणि गुजराती अशा प्रादेशिक भाषांमधील चित्रपट तसेच आम्हाला परवडतील असे यापूर्वी रिलीज केलेले हिंदी किंवा इंग्रजी चित्रपट प्रदर्शित करू', असे दातार म्हणाले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif