Mohan Kapur Fake Death News: मोहन कपूर यांच्या मृत्यूची बातमी खोटी, ट्वीट करत सुरक्षित आणि स्वस्थ असल्याची दिली माहिती
बॉलिवूडमधील काही चित्रपट, टीव्ही सिरियल आणि वेब सीरिज मध्ये काम केलेले अभिनेते मोहन कपूर यांनी ट्विट करत स्वत:च्या मृत्यू बद्दलच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
Mohan Kapur Fake Death News: बॉलिवूडमधील काही चित्रपट, टीव्ही सिरियल आणि वेब सीरिज मध्ये काम केलेले अभिनेते मोहन कपूर यांनी ट्विट करत स्वत:च्या मृत्यू बद्दलच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. याबद्दल त्यांनी ट्विट मध्ये असे ही म्हटले आहे की, मी सुरक्षित आमि स्वस्थ आहे. तर मोहन कपूर यांनी जॉली एलएलबी, बॉडीगार्ड आणि मिशन मंगल सारख्या बहुतांश चित्रपटांत काम केले आहे. सध्या मोहन कपूर हे युएस मध्ये असून आगामी हॉलिवूडच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.(Farmers' Protest: रिहाना, ग्रेटा थनबर्ग नंतर आता ऑस्कर पुरस्कार प्राप्त अभिनेत्री Susan Sarandon यांनी दर्शवला शेतकरी आंदोलनाला पाठींबा, जाणून घ्या काय म्हणाल्या)
मोहन कपूर यांनी ट्विट करत म्हटले की, मी सर्वांना हे सांगू इच्छितो की, मी सुरक्षित आणि स्वस्थ आहे. नुकत्याच एका व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. त्याचे नाव मोहन कपूर असे होते. ही खुप दु:खद गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराच्या दु:खात मी सहभागी असल्याचे मोहन कपूर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळो असे ही ट्विट मध्ये लिहिले आहे.('नाट्यसंपदा'च्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर यांचं निधन)
दरम्यान, शुक्रवारी अशी बातमी आली की एका कारच्या अपघातात मोहन कपूर यांचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचे नाव मोहन कपूरच होते. परंतु ते अभिनेते मोहन कपूर नव्हते. ही बातमी समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियात मोहन कपूर यांना श्रद्धांजली देण्यास सुरुवात केली होती.