Ghar More Pardesiya: 'कलंक' मधील 'घर मोरे परदेसीया' गाणे 20 तासात 1 करोड लोकांनी पाहिले, अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दांची चालली जादू

बॉलिवूड मधील प्रख्यात दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याचा आगामी चित्रपट 'कलंक' (Kalank) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ghar More Pardesiya: 'कलंक' मधील 'घर मोरे परदेसीय' गाणे 20 तासात 1 करोड लोकांनी पाहिले, अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दांची चालली जादू (Photo Credits-Twitter)

Ghar More Pardesiya: बॉलिवूड मधील प्रख्यात दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याचा आगामी चित्रपट 'कलंक' (Kalank) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सोमवारी या चित्रपटातील 'घर मोरे परदेसीया' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) या दोघींमधील नृत्याविष्काराचे अप्रतिम दर्शन यामधून झळकले आहे. तर हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

घर मोरे परदेसीया हे गाणे गेल्या 20 तासात 1 करोड पेक्षा जास्त लोकांनी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहे. तर यु ट्युबवर हे गाणे 2 क्रमांकावर ट्रेंड करत आहे. यामधील आलियाच्या नृत्याने सर्वांची नजर तिच्यावर रोखली गेली आहे. यामध्ये आलियाने सफेद रंगाचे लेंहेंगामध्ये तिचा साधेपणा अधिक खुलुन येत आहे. तर बहार बेगम हिची भुमिका साकारत असलेली माधुरी दीक्षित तिचा बेगम सारखा लूक दिसून येत आहे. गाण्यामध्ये वरुण धवन सुद्धा फक्त फिरताना दिसून येत आहे.(हेही वाचा-Ghar More Pardesiya: 'कलंक' चित्रपटामधील आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित यांचा अप्रतिम नृत्याविष्कार दाखवणारे 'घर मोरे परदेसीया' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला)

कलंक मधील हे गाणे रामायणावर आधारित आहे. ज्यामध्ये सीतेच्या रुपाने गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांनी ते गायले आहे. जर घर मोरे परदेसीया गाण्यातील नृत्याबद्दल बोलायचे झाले तर रेमो डिसूजा याने कोरियोग्राफ केले आहे.