Ghar More Pardesiya: 'कलंक' चित्रपटामधील आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित यांचा अप्रतिम नृत्याविष्कार दाखवणारे 'घर मोरे परदेसीया' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड मधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा करण जोहरचा (Karan Johar) चित्रपट 'कलंक' (Kalank) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ghar More Pardesiya: बॉलिवूड मधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा करण जोहरचा (Karan Johar) चित्रपट 'कलंक' (Kalank) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी आता या चित्रपटातील 'घर मोरे परदेसीया' (Ghar More Pardesiya) हे नवं गाणे प्रदर्शिक करण्यात आले आहे. यामध्ये वरुण धवन, आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित झळकताना दिसून येत आहेत.
'घर मोरे परदेसीया' असे गाण्याचे बोल असून ते श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांनी गायले आहे. तसेच अमित भट्टाचार्या यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून गाण्यातून प्रेमभावना दिसून येत आहे. वरुण धवन, आलिया आणि माधुरी यांचा लूक अतिशय पाहण्यासारखा आहे. तर माधुरी आणि आलिया यांचा अप्रतिम नृत्याविष्काराचे दर्शन या गाण्यातून प्रेक्षकांना होणार आहे.(हेही वाचा-'कलंक' मधून राणीच्या रुपात झळकली आलिया भट्ट, चित्रपटाचे नवीन पोस्टर लॉन्च)
तर नुकतेच या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक झळकवण्यात आले होते. तसेच वरुण धवन, माधुरी दिक्षित यांच्यासह संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा हे कलाकारसुद्धा मुख्य भुमिकेतून दिसणार आहे. येत्या 17 एप्रिल रोजी कलंक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2019 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

