Kalank First Look: 'कलंक' चित्रपटातील आलिया भट्ट हिची भुमिका म्हणजे मोहक रुपाचा नजराणा
स्टारर वरुण धवन (Varun Dhawan) आणि आदित्या रॉय कपूरच्या (Aditya Roy Kapur) लूकनंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) हिच्या मोहक रुपाचा नजराणा पाहायला मिळाला आहे.
Kalank First Look: बॉलिवूडमधील आगामी आणि बहुप्रतिक्षित सिनेमा 'कलंक' (Kalank) या चित्रपटातील कलाकारांचे लूक असणारे फोटो नुकतेच सोशल मीडियावर झळकत आहे. तर स्टारर वरुण धवन (Varun Dhawan) आणि आदित्या रॉय कपूरच्या (Aditya Roy Kapur) लूकनंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) हिच्या मोहक रुपाचा नजराणा पाहायला मिळाला आहे.
या चित्रपटातून आलिया भट्ट रुप नावाच्या एका महिलेची भुमिका साकारणार आहे. तर रुप (Roop) महिलेच्या भुमिकेतील आलिया लाल रंगाच्या जोड्यात अत्यंद सुंदर आणि अप्रतिम दिसून येत आाहे. या लूक मधून ती एका वधूसारखी जरी झळकत असली तरीही रुप महिलेच्या भुमिकेसाठी अत्यंत योग्य निवड आहे.(हेही वाचा-Kalank New Poster: 'कलंक' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर 'आदित्य रॉय कपूर'चा भावुक लूक!)
धर्मा प्रोडक्शन निर्मित वरुण धवन हा कलंक चित्रपटातून मुख्य भुमिकेतून दिसणार आहे. तर आदित्य रॉय कपूर हा एका शिल्पकाराच्या भूमिकेत आणि संजय दत्त बलराज चौधरी नावाच्या व्यक्तीची भुमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले आहे.