Hrithik Roshan Turns 47: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन ला आपले 11 वे बोट कापायचे होते; मात्र 'या' कारणामुळे नाही केली शस्त्रक्रिया

त्याला भीती वाटत होती की, लोक आपल्याला स्वीकारतील की नाही. तीच शंका वडील राकेश रोशनच्या मनातही होती.

ऋतिक रोशन (Photo Credits: Facebook)

Happy Birthday Hrithik Roshan:बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. हृतिक आज 47 वर्षांचा झाला आहे. त्याच्या दृढ व्यक्तिमत्त्वामुळे आणि आकर्षक लुकमुळे हृतिकने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील लोकांना वेड लावले आहे. आज हृतिकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याचा एक किस्सा सांगणार आहोत. ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. कदाचित तुम्हाला हे माहित असेल की, हृतिकच्या हातात 11 बोटे आहेत.

बॉलिवूडमध्ये पदार्पण होण्यापूर्वी हृतिकचा आपल्या 11 व्या बोटामुळे गोंधळ उडाला होता. त्याला भीती वाटत होती की, लोक आपल्याला स्वीकारतील की नाही. तीच शंका वडील राकेश रोशनच्या मनातही होती. यामुळे, त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की, शस्त्रक्रिया करून त्यांचे अतिरिक्त बोट कापून काढायचे. यासाठी सर्व व्यवस्था केली गेली होती आणि शस्त्रक्रिया जवळजवळ सुरू होणार होती. (Remo D'Souza हार्ट सर्जरी नंतर पहिल्यादाचं पोहोचले जीम; दमदार वापसीचा व्हिडिओ पाहून चाहते झाले खूश)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

मात्र, हृतिकची आई पिंकी रोशनने (Pinkie Roshan) तिची शस्त्रक्रिया थांबवली. त्या म्हणाल्या की, हृतिकला दिलेलं 11 वे बोट ही देवाने दिलेली देण आहे. त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे. आपण त्यात छेडछाड करणारे कोण आहोत? या बोटामुळे हृतिकला लहानपणापासून कधीच त्रास झाला नाही. त्यामुळे हे बोट काढून टाकणे निरर्थक ठरेल. (अभिनेत्री दिशा पटानी हिची रिक्षा सवारी; पहा Photos)

दरम्यान, आईच्या या गोष्टी ऐकल्यानंतर हृतिकनेही आपला निर्णय बदलला आणि राकेश रोशन यांनीही पिंकी यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. यानंतर हृतिकने आपल्या 11 बोटाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. लोकांनी त्याला मनापासून स्विकारलं. हृतिकने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. आज हृतिकचे लाखो चाहते आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif