दिवाळीच्या हटके शुभेच्छा: चोळी घालायाल विसरली; स्पोर्टी ब्रामध्ये झळकली; ट्रोल झाली दिशा पटानी

इन्स्टाग्रामवर तिने या छायाचित्राच्या पोस्टची सेटींग प्रायव्हेट केली आहे. जेणेकरुन लोकंनी तिच्याबाब काही उलटसुलट प्रतिक्रिया देऊ नये. पण, इतके करुनही ती ट्रोल व्हायचे ती झाली.

दिशा पटानी, अभिनेत्री ( (Photo Credits: instagram

आपल्या हटके रुपात दर्शन देत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणं हे अभिनेत्री दिशा पटानी हिला चांगलंच भारी पडलं आहे. आपल्या खास अंदाजात तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या. पण, दिवळी सणाच्या शुभेच्छा देताना दिशाचं सोशल मीडियावरचं वागणं नेटकऱ्यांना काही फारसं रुचलं नाही. त्यामुळे अनेक युजर्सनी दिशावर टीका तर केलीच, पण ती सोशल मीडियावर ट्रोलही झाली. त्याचं झालं असं की, आपल्या खास अंदाजात दिशाने चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. पण, या शुभेच्छा देताना दिशा चोळी घालायलाच विसरली. अन मग ट्रोलींग सुरु झालं. काय आहे प्रकार घ्या जाणून!

पारंपरीक पोषाखावर स्पोर्टी ब्रा; चाहत्यांना नाही आवडली दिशा

दिवाळी सणात महत्त्वाचा दिवस असलेल्या धनत्रयोदशीचे औचित्य साधत दिशा पटानीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट म्हणजे एक छायाचित्र आहे. ज्यात ती सण, समारंभातील खास पोषाखात दिसते आहे. छायाचित्रात दिशाच्या हाता एक ज्योत असलेला दिवाही (पणती) दिसतो आहे. पण, दिशाने ज्योत असलेला दिवा हातात घेतला म्हणून तिच्या चाहत्यांना काहीच म्हणायचे नाही. त्यांचा राग आहे तो तिच्या पोषाखावर. छायाचित्रात दिसते की, दिशाने एक भला मोठा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर शोभेल अशी सुंदर ज्वेलरीही परिधान केली आहे. आणि आपल्या भांगेत टीळा लाऊन केसही सुंदर बांधले आहेत. तसेच, खांद्यवरुन तिने छान ओढणीही घेतली आहे. पण, इतके सगळे छान असूनही ती ट्रोल झाली आहे. कारण, तिची चोळी. या अत्यंत भरजरी वस्त्रांमध्ये दिशाने चोळी घालण्याऐवजी ती चक्क स्पोर्टी ब्रामध्ये दिसते. दिवाळीचे औचित्य असताना पारंपरीक पोषाकात स्पोर्टी ब्रा हे समिकरण काही दिशाच्या चाहत्यांना आवडले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

एका ब्रॅंडच्या प्रमोशनासाठी हटके पोषाख

स्पोर्टी ब्रा परिधान केलेला दिशाचे छायचित्र पाहताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. दरम्यान, दिशाचे हे छायाचित्र म्हणजे, दिवाळीसोबत एका ब्रॅंडचे प्रमोशन आहे. या ब्रॅंडच्या प्रमोशनसाठी दिशाने दिवाली आणि दिवा अशी थिम घेतल्याचे समजते. पण, लोकांना काही तिचा विचार फारसा भावला नाही. (हेही वाचा, व्हिडीओ : पाहा गौरी खानने इंटेरियर डिझाईन केलेले सिद्धार्थ मल्होत्राचे सुंदर घर)

 

View this post on Instagram

 

Just wrapped A great association coming up real soon with my most favourite brand most excited

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दरम्यान, लोकांकडून अशी प्रतिक्रिया येऊ शकते याची कदाचीत थोडीफार कल्पना दिशाला आली असावी. इन्स्टाग्रामवर तिने या छायाचित्राच्या पोस्टची सेटींग प्रायव्हेट केली आहे. जेणेकरुन लोकंनी तिच्याबाब काही उलटसुलट प्रतिक्रिया देऊ नये. पण, इतके करुनही ती ट्रोल व्हायचे ती झाली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now