Dhaakad Poster: धाकड़ सिनेमातील दिव्या दत्ता चा बोल्ड लूक आऊट
त्यापूर्वी सिनेमातील कलाकारांचे लूक्स समोर येत आहेत. कंगना रनौत, अर्जुन रामपाल यांच्यानंतर दिव्या दत्ता चा दमदार लूक समोर आला आहे. ज्यात ती अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे
कंगना रनौत हिचा धाकड़ (Dhaakad) सिनेमा 1 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी सिनेमातील कलाकारांचे लूक्स समोर येत आहेत. कंगना रनौत (Kangana Ranaut), अर्जुन रामपाल (Arjun Rampal) यांच्यानंतर दिव्या दत्ता (Divya Dutta) चा दमदार लूक समोर आला आहे. ज्यात ती अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे. यात दिव्याने हिरव्या रंगाची साडी नेसली अूसन लाल रंगाचा प्रिटेंट ब्लाऊज घातला आहे. ऑक्सडाईज ज्वेलरीने दिव्याचा लूक अधिकच खुलवला आहे. मात्र यातील दिव्याची पोज बोल्ड असून आणि चेहऱ्यावरील भाव गंभीर आहेत.
हे पोस्टर दिव्या दत्ताने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या पोस्टमध्ये दिव्याने लिहिले की, "ही खतरनाक दिसते. पण ती किती वाईट आहे याचे वर्णन केलेले नाही. धाकड़ सिनेमातील रोहिणी च्या भूमिकेतील माझा पहिला लूक सादर करत आहे. हा सिनेमा 1 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल." (Dhaakad Poster: 'धाकड़' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, अॅक्शन मोड मध्ये दिसणार कंगना रनौत)
दिव्या दत्ता पोस्ट:
(Dhaakad: कंगना रनौत चा चित्रपट 'धाकड़' मध्ये अर्जुन रामपाल बनला खलनायक; पहा जबरदस्त लूक)
यापूर्वी कंगना रनौत आणि अर्जुन रामपाल यांचे लूक निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या लूक्सला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. या सिनेमात अर्जुन रुद्रवीर च्या भूमिकेत दिसणार आहे. यातील अर्जुन अतिशय खतरनाक होता. हातात बंदुक, लेटर जॅकेटमध्ये गँग माफिया प्रमाणे भासत होता.