IPL Auction 2025 Live

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण Uri: The Surgical Strike सिनेमाच्या कलाकारांच्या भेटीला

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी उरी: द सर्जिकल स्ट्राईक सिनेमातील कलाकारांची भेट घेतली.

Nirmala Sitharaman with Uri Film Star Cast (Photo credit-File Photo)

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' (Uri: The Surgical Strike) सिनेमातील कलाकारांची भेट घेतली. सेनाप्रमुख बिपिन रावत यांच्या घरी या भेटीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal), यामी गौतम (Yami Gautam), दिग्दर्शक आदित्य थर (Aditya Dhar) आणि निर्माता रोनी स्क्रुवाला (Ronnie Screwvala) उपस्थित होते.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करुन या कलाकारांना शुभेच्छा दिल्या होत्या. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, "सेना दिवसानिमित्त बिपिन रावत यांच्या घरी... उरी: द सर्जिकल स्ट्राईक च्या टीमसोबत. अजूनही मी सिनेमा पाहिलेला नाही. मात्र त्याबद्दल खूप ऐकले आहे. विक्की कौशल, यामी गौतम, आदित्य थर आणि रोनी स्क्रुवाला यांनी सैनिकांच्या भावना दर्शवणारा सिनेमा निर्माण केला याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा."

अभिनेता विक्की कौशलनेही ट्विट करत लिहिले की, "तुम्हाला भेटणे सन्मानाची गोष्ट आहे." तर यामी गौतमनेही "आम्ही तुम्हाला भेटून सन्मानित झालो आहोत.. तुम्ही केलेल्या कौतुकासाठी धन्यवाद. तुम्ही देशासाठी जे करता ते अतुलनीय आहे," असे म्हटले आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर हा सिनेमा आधारलेला आहे. हा सिनेमा 11 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांकडून सिनेमाचे कौतुक होत असून बॉक्स ऑफिसवरही सिनेमा चांगली कमाई करत आहे.