Anushka and Virat Kohli Spotted at Khar: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला खार मधील क्लिनिक येथे करण्यात आले स्पॉट, पहा फोटो

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरी आता लवकरत नव्या पाहुण्याचे स्वागत होणार आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (फोटो सौजन्य- Yogen Shah)

Anushka and Virat Kohli Spotted at Khar:  अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरी आता लवकरत नव्या पाहुण्याचे स्वागत होणार आहे. तर विरुष्का यांनी त्यांच्या चिमुकल्याबद्दलची गोड बातमी जाहीर केल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या. तर अनुष्काचे ही बेबी बंप फ्लॉन्टिंग करतानाचे फोटोशूट सध्या समोर आले आहे. यातच आता अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या दोघांना खार मधील क्लिनिक मध्ये स्पॉट करण्यात आले आहे.(Anushka Sharma Baby Bump Pics: सूर्याच्या किरणांनी खुललं गरोदर अनुष्का शर्मा चे सौंदर्य, बेबी बंप दाखवत शेअर केला हा सुंदर फोटो)

अनुष्का शर्मा हिने ब्लॅक रंगाचे लॉन्ग हुडी ड्रेस घातला असून विराट हा ग्रे रंगाच्या टी शर्टमध्ये दिसून येत आहे. तर दोघांना आज खार मधील क्लिनिक येथे स्पॉट केले गेल्याचे फोटो समोर आले आहेत. तर विरुष्का हे चिमुकल्याच्या येण्याने  अत्यंत खुश असून अनुष्का ही आपल्या फिटनेसकडे तितकेच लक्ष देत आहे. (Anushka Sharma Baby Bump Photo: अनुष्का शर्मा ने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला बेबी बंपचा फोटो, करीना कपूर, मौनी रॉयसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्समधून दिल्या शुभेच्छा)

Anushka Sharma and Virat Kohli (Photo Credits-Yogen Shah)
Anushka Sharma and Virat Kohli (Photo Credits-Yogen Shah)

यापूर्वीही बर्‍याचदा अनुष्का प्रेग्नन्ट असल्याची अफवा पसरली होती, पण तिने त्या सर्व अफवा फेटाळून लावल्या. बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींपेक्षा अनुष्काला लवकर लग्न करण्याविषयीही अनेकदा प्रश्न विचारण्यात आले. दुसरीकडे वर्क फ्रंटवर, अनुष्काने लॉकडाऊन दरम्यान 'पाताललोक' आणि 'बुलबुल' सारख्या आश्चर्यकारक वेब शोद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. निर्माता म्हणून अनुष्काच्या निवडीबद्दल चाहत्यांनी देखील कौतुक केले. अनुष्का अखेर 'झिरो' चित्रपटात झळकली होती जो 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.