Anusha Dandekar चा हॉट फोटो पाहून Bra पाठवण्यासाठी युजर उत्सुक; अभिनेत्रीनी केली बोलती बंद!
यावरुन तिच्या हॉटनेसचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक होत आहे. परंतु, काहींनी तिला ट्रोल करण्याची संधी देखील सोडली नाही.
अभिनेत्री आणि व्हीजे अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) सोशल मीडियावर आपले हॉट फोटोज (Hot Photos) शेअर करत असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल मीडियावर नेहमीच हिट ठरतात. अनुषाचे असंख्य चाहते असून फोटोज, व्हिडिओज शेअर करुन ती चाहत्यांशी कनेक्टेट राहते. अलिकडेच अनुषाने तिचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरुन तिच्या हॉटनेसचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक होत आहे. परंतु, काहींनी तिला ट्रोल करण्याची संधी देखील सोडली नाही.
अनुषाने फोटो शेअर करत लिहिले, "जर तुम्ही मला लॉक करणार असाल तर मला माझ्या या आवडीच्या गोष्टींसोबत लॉक करा." या फोटोत अनुषा वुलन जॅकेट घालून बेडवर बसली आहे. हॉट पोज देणाऱ्या अनुषासमोर तिच्या आवडीच्या काही गोष्टी आहेत. या फोटोवरुन तिला एका युजरने ट्रोल केले आहे. (Anusha Dandekar ने शेअर केला Topless Photo; अभिनेत्रीच्या बोल्डनेसने चाहते दंग)
पहा फोटो:
युजरने कमेंटमध्ये लिहिले, "माझ्याकडे ब्रा ची एक्स्ट्रा जोडी आहे. तुझा पत्ता पाठव मी कुरीयर करते." यावर अनुषा म्हणाली, "ती तूच ठेव. मी त्याशिवायच छान आहे. धन्यवाद."
सेलिब्रिटींना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही वेळेस त्याकडे दुर्लक्ष केले जाते तर काही वेळेस असे सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली जाते.