Ananya Panday Hot Photoshoot: अनन्या पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)

तिने स्टुडंट ऑफ द इयर 2 द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनन्या पांडे लवकरच दीपिका पदुकोणसोबत एका चित्रपटात दिसणार आहे

Ananya Panday Hot Photoshoot (Photo Credit : Instagram)

अभिनेता चंकी पांडेची कन्या अनन्या पांडे (Ananya Panday) ही एक बॉलिवूडच्या तरुण आणि नव्या पिढीमधील अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्याकडे खरच प्रतिभा आहे की नाही हा मोठा प्रश्न असला तरी, सोशल मिडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. याआधी अनन्याने तिच्या बिकिनीमधील फोटोशूटची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. अनन्या पांडेने एका मासिकासाठी हे फोटोशूट केले होते. आता नुकतेच तिने आपल्या अजून एका फोटोशूटची छायाचित्रे पोस्ट केली आहेत व नवे हे फोटोज प्रचंड व्हायरल होत आहेत.

या नव्या फोटोशूटमध्ये अनन्या अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल. सोबतच तिचा हा सिझलिंग लूक तुम्हाला वेडा करेल. एका कार सोबत अनन्याने हे फोटोशूट केले आहे. ज्यामधील तिचे कपडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

या फोटोमधील अनन्याचा मेकअप आणि हेअर वाखाणण्याजोगा आहे. झुनैली मलिकने अनन्याची ही स्टाईल केली आहे, तर तरस तारापोरवालाने हे फोटो क्लिक केले आहेत. या फोटोमध्ये अनन्या ब्रा आणि एका काळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये दिसत आहे. या फोटोमधील लायटिंगमुळे त्याला ‘चार चांद’ लागले आहेत. या फोटोखाली अनेक सेलेब्जनी कमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

दरम्यान, अनन्या पांडे ही चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी आहे. तिने स्टुडंट ऑफ द इयर 2 द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनन्या पांडे लवकरच दीपिका पदुकोणसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले आहे.