Alia Bhatt Baby Shower: दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडले आलिया भट्टचे डोहाळेजेवण; कुटुंबासोबत जवळच्या मित्रांनी लावली हजेरी (Watch Photo and Videos) 

14 एप्रिल 2022 रोजी त्यांचे लग्न झाले होते. लग्नाचा घरीच एक खाजगी सोहळा पार पडला, ज्यात भट्ट आणि कपूर कुटुंबातीलच लोक उपस्थित होते.

Alia Bhatt Baby Shower (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. सध्या आलिया भट्ट प्रेग्नेंसीदरम्यान तिच्या विविध लूक्समुळे चर्चेत आहे. आज दसऱ्याच्या खास दिवशी आलिया भट्टचे डोहाळेजेवण आयोजित केले होते. यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांनी हजेरी लावली होती. आलियाच्या बेबी शॉवर सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात ती कपूर कुटुंब, भट्ट कुटुंबाव्यतिरिक्त जवळच्या नातेवाईकांसोबत दिसत आहे. आलिया भट्टची वहिनी रिद्धिमा कपूर साहनी हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.

लग्नाप्रमाणेच आलियाचे डोहाळेजेवण देखील अगदी सध्या पद्धतीने पार पडले. यावेळी तिने डिझायनर पिवळा सूट परिधान केला होता. सोबत तिने सुंदर नेकलेस, मांग टिका आणि कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला होता. त्याचवेळी रणबीर कपूर पारंपरिक कुर्ता आणि पायजमामध्ये दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

 

 

आलियाच्या बेबी शॉवरमध्ये सासू नीतू कपूर, वहिनी रिद्धिमा साहनी कपूर, आलियाची बहीण शाहीन भट्ट, पूजा भट्ट, आजी नीला देवी, आकांक्षा रंजन सिंह, नव्या नंदा, श्वेता बच्चन, आरती शेट्टी आणि करिश्मा कपूर उपस्थित होत्या. (हेही वाचा: माधुरी दीक्षितने मुंबईत खरेदी केलं 48 कोटी रुपयांचे नवीन घर; पहा Luxurious फ्लॅटचे खास फोटोज)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir.kapoor (@ranbir.kapoorr_)

दरम्यान, या वर्षी जूनमध्ये आलिया आणि रणबीरने चाहत्यांना गरोदरपणाची बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. 14 एप्रिल 2022 रोजी त्यांचे लग्न झाले होते. लग्नाचा घरीच एक खाजगी सोहळा पार पडला, ज्यात भट्ट आणि कपूर कुटुंबातीलच लोक उपस्थित होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif