एकाच व्यक्तीमध्ये मला 5 बॉयफ्रेंड मिळाले म्हणत अभिनेत्री नेहा धुपिया ने पती अंगद बेदी ला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

एकाच व्यक्तीमध्ये मला 5 बॉयफ्रेंड मिळाले म्हणत अभिनेत्री नेहा धुपिया ने पती अंगद बेदी याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज नेहा आणि अंगदच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून अंगदसोबतचा एक फोटो शेअर केला असून हटके कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमुळे सर्वांचे लक्ष नेहाच्या पोस्टकडे लागले आहे. नेहाने या पोस्टमध्ये ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. 'मला एकाच व्यक्तीमध्ये 5 बॉयफ्रेंड मिळाले,' असा टोला लगावला आहे.

Neha Dhupia, Angad Bedi (PC - Instagram)

एकाच व्यक्तीमध्ये मला 5 बॉयफ्रेंड मिळाले म्हणत अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) ने पती अंगद बेदी (Angad Bedi) याला लग्नाच्या वाढदिवसाच्या (Wedding Anniversary) शुभेच्छा दिल्या आहेत. आज नेहा आणि अंगदच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून अंगदसोबतचा एक फोटो शेअर केला असून हटके कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमुळे सर्वांचे लक्ष नेहाच्या पोस्टकडे लागले आहे. नेहाने या पोस्टमध्ये ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. 'मला एकाच व्यक्तीमध्ये 5 बॉयफ्रेंड मिळाले,' असा टोला लगावला आहे.

नेहा धुपियाने एका शोदरम्यान 5 बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी, असं विधान केलं होतं. त्यामुळे नेटीझन्सनी नेहाला ट्रोल केलं होतं. परंतु, ट्रोलर्सला नेहाने हटके पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाचं निमित्त साधून नेहाने ट्रोलर्सला चांगलचं सुनावलं आहे. (हेही वाचा - 'मदर्स डे' च्या शुभेच्छा देत सनी लिओनी ने आपल्या मुलांसोबत शेअर केला क्यूट फोटो)

 

View this post on Instagram

 

Happy anniversary my love ... to two years of togetherness 💕... "Angad is like 1. The love of my life , 2. a suport system, 3. a great father, 4. My best friend and 5. The most annoying roommate ever. It's like I have 5 bfs in one...it's my choice." #thosewhoknowknow #nehaangad 📸 @thememoryalbum_

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

पती अंगदला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नेहाने म्हटलंय, 'हॅप्पी अॅनिव्हर्सरी माय लव्ह. एकमेकांसोबतचे दोन वर्ष घालवल्यानंतर अंगद असा आहे 1. माझ्या आयुष्यातलं प्रेम, 2. माझी सपोर्ट सिस्टीम, 3. एक चांगला पिता, 4. माझा बेस्टफ्रेंड, 5. सतत त्रास देणारा रुममेट. मला एकाच व्यक्तीमध्ये 5 बॉयफ्रेंड मिळाले आहेत. ही माझी निवड आहे.'

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now