Volkswagen Polo आणि Vento चे भारतात लॉन्च झाले टर्बो मॉडेल, किंमत 6.99 लाखांपासून सुरु
जर्मनची वाहन निर्माती कंपनी फॉक्सवॅगनने आज भारतात आपल्या प्रमुख मॉडेल पोलो(Polo) आणि वेंटोचे (Vento) टर्बो वर्जन लॉन्च केले आहे. ज्यामध्ये नव्या टर्बो एडिशन पोलोची किंमत 6.99 लाख रुपये आणि टर्बो वेंटोची किंमत 8.69 लाख एक्स शो रुम, दिल्ली ठेवली आहे.
जर्मनची वाहन निर्माती कंपनी फॉक्सवॅगनने आज भारतात आपल्या प्रमुख मॉडेल पोलो(Polo) आणि वेंटोचे (Vento) टर्बो वर्जन लॉन्च केले आहे. ज्यामध्ये नव्या टर्बो एडिशन पोलोची किंमत 6.99 लाख रुपये आणि टर्बो वेंटोची किंमत 8.69 लाख एक्स शो रुम, दिल्ली ठेवली आहे. त्यामुळे जर तुम्ही या दोन गाड्यांचे टर्बो वर्जन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ती अधिकृत वेबसाइटवर कंपनीच्या डिलरशिपवर बुकिंग करु शकता.(भारतात Renault Kiger ची 'या' दिवशी सुरु होणार बुकिंग, जाणून घ्या सविस्तर)
पोलो आणि वेंटोचे नवे टर्बो एडिशन कम्फर्टलाइन वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिले आहे. या दोन गाड्यांमध्ये कंपनीने 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड स्ट्रेटिफाइड इंजेक्शनचे इंजिनचा वापर केला आहे. जो 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी तयार केला आहे. हे इंजिन 5000-5500 आरपीएमवर 108bhp ची अधिकाधिक पॉवर आणि 1750-4000 आरपीएमवर 175Nm चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. दोन्ही कारच्या टर्बो एडिशनध्ये ग्लॉसी ब्लॅक स्पॉइलर, ORVM कॅप्स, फेंडर बैज आणि स्पोर्टी सीट कव्हरसह काही फिचर्सचा समावेश आहे. तर टर्बो वर्जन सुद्धा सर्व रंगात उपलब्ध आहे.
फॉक्सवॅगन वाहने त्यांच्या मजबूत निर्माणसाठी जाणल्या जातात. त्याचसोबत पोलो देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक पैकी एक आहे. पोलो ही ग्लोबल एनसीएपी द्वारे 4 स्टार सुरक्षा रेटिंगसह येते. पोलो मध्ये ABS, डुअल फ्रंट एअरबॅग, EBD,ISOFIX पॉइंट, रिव्हर्स पार्किंग सेंसरसारखे सेफ्टी फिचर्स मिळणार आहेत.(Detel ची इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये धावणार 60 किमी, चालवण्यासाठी लायसन्सची गरज नाही भासणार)
टर्बो वर्जनच्या लॉन्चिंगची घोषणे बद्दल बोलताना फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँन्ड डायरेक्टर आशीष गुप्ता यांनी असे म्हटले की, एक्सेसिबिलिटी फॉक्सवॅगन मध्ये सुरक्षित आणि सावधगिरीपूर्वर जर्मन-इंजिनियर गोष्टींचा अनुभवण्याची क्षमता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)