Bike Helmet खरेदी करताना 'या' टीप्स जरुर लक्षात ठेवा

बहुतांश लोक बाईकसाठी हेल्मेट खरेदी करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कोणत्याही साईज आणि शेप मधील खरेदी करतो. त्यामुळे बाईक चालवताना आपल्याला काही वेळेस त्रास होत असल्याचे ही जाणवते.

Helmet | (Archived and representative images)

बहुतांश लोक बाईकसाठी हेल्मेट खरेदी करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कोणत्याही साईज आणि शेप मधील खरेदी करतो. त्यामुळे बाईक चालवताना आपल्याला काही वेळेस त्रास होत असल्याचे ही जाणवते. खरंतर हेल्मेट खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात असणे फार जरुरीचे आहे. त्याचसोबत तुमच्या बाईकनुसार उत्तम हेल्मेट निवडा.(Motor Vehicle Documents Validity: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा; वाहनांचे ड्रायव्हिंग लायसेन्स, RC सह इतर कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबरपर्यंत वाढली)

तुम्ही कधी हेल्मेट खरेदी करताना त्याच्या आकारकडे लक्ष दिले आहे का? कारण प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याचा आकार वेगळा असतो. अशातच तुम्ही हेल्मेट खरेदी करताना तुमच्या डोक्याचा आकाराच्या थोडे मोठे ते खरेदी करा. कारण हेल्मेट घालून बाईक चालवताना तुम्हाला त्याचा त्रास होत अससल्याचे जाणवणार नाही.(Car Safety Features: ABS ते TPMS पर्यंत 'या' 4 उत्तम सेफ्टी फिचर्स शिवाय नवी कार खरेदी करु नका)

जर तुम्ही चेहरा झाकला जाईल असे हेल्मेट खरेदी करण्याचा विचार करत असल्यास त्यामधून हवा खेळती रहाणे गरजेचे आहे. काही हेल्मेट्सला लहान-लहान वेंट्स दिले जातात. त्यामुळे बाईक चालवताना डोक्यात घातलेल्या हेल्मेट मधून हवा आतमध्ये जाते. तसेच चालकाला हेल्मेट घातल्यामुळे गरम होत असल्याचे सुद्धा जाणवत नाही.

बाईक चालवताना हेल्मेटचे वाइजर तुमची Visibility वाढवतो. काही वेळेस बाईक चालवताना रात्र झाल्यास वाइजर ग्लेअर फ्री न झाल्यास बाईक चालवताना तुम्हाला समस्या उद्भवू शकते. खरंतर ग्लेअर फ्री वाइजर रात्रीच्या वेळेस बाईक चालवताना रस्त्यावरील Visibility वाढवतो.(Motor Insurance: वाहनाच्या Insurance साठी आता PUC असणे अत्यावश्यक, IRDA यांनी जाहीर केले आदेश)

सर्वात महत्वाचे म्हणजे बाईक हेल्मेटमध्ये कुशिंग असणे फार गरजेचे आहे. कारण अशा पद्धतीचे हेल्मेट तुम्ही अधिक वेळ घालू शकता. तसेच कुशिंग उत्तम असल्यास तुमच्या डोक्याला थंडावा मिळत राहील. तर या सर्व काही सोप्प्या महत्वाच्या टीप्स हेल्मेट खरेदी करताना जरुर लक्षात ठेवा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now