नवी Honda City लवकरच होणार लॉन्च, 5 हजार रुपयात करता येणार बुकिंग

ही कार ग्राहकांना ऑनलाईन किंवा कंपनीच्या डिलरशिपच्या माध्यमातून बुकिंग करता येणार आहे. नवी होंडा सिटीची बुकिंग कंपनीने ऑनलाईन सेल्स प्लॅटफॉर्म Honda From Honda च्या माध्यमातून फक्त 5 हजार रुपयात करता येणार आहे.

Honda (Photo Credits-twitter)

होंडा कार्स इंडिया यांनी नवी Honda City ची बुकिंग सुरु केली आहे. ही कार ग्राहकांना ऑनलाईन किंवा कंपनीच्या डिलरशिपच्या माध्यमातून बुकिंग करता येणार आहे.  नवी होंडा सिटीची बुकिंग कंपनीने ऑनलाईन सेल्स प्लॅटफॉर्म Honda From Honda च्या माध्यमातून फक्त 5 हजार रुपयात करता येणार आहे. तर कंपनीच्या डिलरशिपच्या माध्यमातूच हिच कार ग्राहकांना 20 हजार रुपयात बुकिंग करता येणार आहे. नवी सिटीचे लॉन्चिंग जुलै महिन्यात होणार आहे.

नवी होंडा सिटी सध्याच्या मॉडेलपेक्षा आकाराने मोठी आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, न्यू जनरेशन सिटी नव्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. जी जुन्या मॉडेलच्या तुलनेत अधिक हलकी आणि अधिक सेफ आहे. सिटी ही त्यांच्या सेगमेंट मधील पहिली कार आहे. यामध्ये लेन वॉच असिस्ट सिस्टमसह व्हेइकल स्टॅबिलिटी असिस्ट (VSA) आणि अॅजल हँडलिंग असिस्ट (AHA) सेफ्टी फिचर्स मिळणार आहेत.(BS6 Honda Garzia 125 स्कूटर भारतात लॉन्च, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत)

कारमध्ये ग्राहकांना अॅन्ड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले आणि वेबलिंक कनेक्टिव्हिटीसह 8.0 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, अलेक्सा रिमोट कपॅबिलिटी आणि 32 कनेक्टेड कार फिचर्ससह होंडा कनेक्ट टेलेमॅटिक्स सिस्टम, 7.0 इंचाचा MID, इलेक्ट्रिक सनरुफ, हँड्स फ्री बूट ऑपरेटिंग, ऑटो-डिमिंग IRVM, अॅम्बिएंट लाईटिंग, की-लेस अॅन्ड गो, रिमोट इंडिन स्टार्टसह अन्य फिचर्स सुद्धा मिळणार आहेत.

सेफ्टी फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास ग्राहकांना 6 एअरबॅग्स, ईबीडी, ब्रेक असिस्ट, हिल स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, ISOFIX चाईल्ड सीट माउंट्सस रियर पार्किंग कॅमेरा आणि ऑटो हेडलॅम्प्स आणि वायपर्स ही देण्यात आले आहेत.(Tata Gravitas ला टक्कर देण्यासाठी लॉन्च होणार Hyundai Creta, जाणून घ्या खासियत)

न्यू जनरेशन होंडा सिटी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही ऑप्शन मध्ये येणार आहे. यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 121 HP पॉवर आणि 145 Nm चा टॉर्क जनरेट करु शकणार आहे. त्याचसोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि 7स्पीड CVT  अटोमेटिक गियरबॉक्स सु्द्धा ऑप्शन मिळणार आहेत. डिझेल इंजिन जुन्या मॉडेल्स मधून घेण्यात आले आहे. 1.5 लीटरचे हे डिझेल इंजिन 100 hp ची पॉवर आणि 200Nm चा टॉर्क जनरेट करु शकणार आहे. इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सपेक्षा कमी आहे.