India’s First CNG Tractor: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लॉन्च केला भारतामधील पहिला सीएनजी ट्रॅक्टर; वर्षाला होईल लाखोंची बचत, जाणून घ्या वैशिष्ट्ये
सीएनजी ट्रॅक्टर अधिक सुरक्षित आहे कारण सीएनजी टँकवर घट्ट सील असेल. यामुळे इंधन भरण्याच्या दरम्यान किंवा इतरवेळी स्फोट होण्याचा धोका कमी होईल. जगात आधीच 12 दशलक्ष वाहने नैसर्गिक वायूने चालविली आहेत आणि दररोज अधिक कंपन्या आणि नगरपालिका सीएनजीला प्राधान्य देत आहेत
शुक्रवारी भारतात देशातील पहिला सीएनजी ट्रॅक्टर (CNG Tractor) लॉन्च करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारतातील पहिला सीएनजीमध्ये रूपांतरित डिझेल ट्रॅक्टर सादर केला. या ट्रॅक्टरमुळे वर्षामध्ये सुमारे एक ते दोन लाख रुपयांची बचत होईल, असा दावा केला जात आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि डिझेलपेक्षा खर्च कमी होईल असेही सांगितले जात आहे. हा ट्रॅक्टर लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशिवाय धर्मेंद्र प्रधान, जनरल व्ही. के. सिंह आणि पुरुषोत्तम रुपाला उपस्थित होते.
हा ट्रॅक्टर रोमॅट टेक्नो सोल्यूशन आणि टोमॅसेटो एकाइल इंडियाने संयुक्तपणे विकसित केला आहे. कंपनीच्या मते, यामुळे शेतकर्यांचा खर्च कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ग्रामीण भारतात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासही मदत होईल. मंत्रालयाचे म्हणणे आहे की सीएनजी, इंधनावरील खर्चात लक्षणीय घट करेल तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होईल.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने सीएनजी ट्रॅक्टरचे मानक निश्चित केले आहेत. या प्रमाणानुसार बाजारात ट्रॅक्टर उपलब्ध असतील. ट्रॅक्टरमध्ये सीएनजी किट बसविण्यात येणार असून यामुळे शेतीचा खर्च कमी होईल. ट्रॅक्टर अन्य सीएनजी वाहनांप्रमाणेच डिझेलने सुरू होईल, परंतु नंतर सीएनजीवरून धावेल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मेक इन इंडिया अंतर्गत सीएनजी किट तयार केले आहे. शेतीमध्ये वापरली जाणारी इतर साधने बायोसीएनजीमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे.
ट्रॅक्टरचे डिझेलमधून सीएनजीमध्ये रूपांतर करणे फायद्याचे ठरेल, कारण हे कमीतकमी कार्बन आणि प्रदूषण उत्सर्जनासह स्वच्छ इंधन आहे. सीएनजीचे इंजिनाचे आयुष्य देखील जास्त आहे आणि त्याची कमी देखभाल करावी लागेल. शेतीत ट्रॅक्टरच्या सरासरी वापरामुळे प्रति तासाला 4 लिटर डिझेल लागते. (खर्च ट्रॅक्टरच्या हॉर्सपॉवरवर अवलंबून असतो) त्याचा खर्च 78 रुपये प्रति लिटरनुसार 312 आहे. त्याचवेळी सीएनजीद्वारे ट्रॅक्टर चालविण्यासाठी 4 तासाला सुमारे 200 रुपये खर्च अपेक्षित आहे. (हेही वाचा: Detel ची इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये धावणार 60 किमी, चालवण्यासाठी लायसन्सची गरज नाही भासणार)
सीएनजी ट्रॅक्टर अधिक सुरक्षित आहे कारण सीएनजी टँकवर घट्ट सील असेल. यामुळे इंधन भरण्याच्या दरम्यान किंवा इतरवेळी स्फोट होण्याचा धोका कमी होईल. जगात आधीच 12 दशलक्ष वाहने नैसर्गिक वायूने चालविली आहेत आणि दररोज अधिक कंपन्या आणि नगरपालिका सीएनजीला प्राधान्य देत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)