Mahindra XUV500 Car: कमी पैशात चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 'महिंद्रा एक्सयूव्ही 500' ठरू शकते बेस्ट ऑपशन; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
महिंद्रा एक्सयूव्ही 500 ही भारतातील एक लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. अनेकदा कार खरेदी करणं ग्राहकांच्या बजेटमध्ये नसतं. मात्र, जर तुम्ही Mahindra XUV500 खरेदी करण्याची योजना आखत असाल, आणि तुमचे बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला या एसयूव्हीचे स्वस्त व्हेरिएंट W5 चे फिचर्स सांगणार आहोत. जे तुमच्या बजेटमध्ये नक्की बसेल.
Mahindra XUV500 Car: महिंद्रा एक्सयूव्ही 500 ही भारतातील एक लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. अनेकदा कार खरेदी करणं ग्राहकांच्या बजेटमध्ये नसतं. मात्र, जर तुम्ही Mahindra XUV500 खरेदी करण्याची योजना आखत असाल, आणि तुमचे बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला या एसयूव्हीचे स्वस्त व्हेरिएंट W5 चे फिचर्स सांगणार आहोत. जे तुमच्या बजेटमध्ये नक्की बसेल.
Mahindra XUV500 च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलतायचे झाले तर Mahindra XUV500 BS6 च्या डीझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 2.2 लीटरचे इंजिन आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 153 BHP उर्जासह 360 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह 6-स्पीड स्वयंचलित टॉर्क कन्व्हर्टर गीअरबॉक्स देण्यात आला आहे. याशिवाय एसयूव्हीमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. (हेही वाचा - Maruti Diwali Offers: या दिवाळीत मारुती कारच्या खरेदीवर मिळवा तब्बल 55 हजारांपर्यंत सूट; वाचा सविस्तर)
Mahindra XUV500 च्या W5 व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना 15 सेमी मोनोक्रोम इन्फोटेनमेंट डिस्प्ले (जीपीएस, यूएसबी आणि ब्लूटूथसह), प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, मायक्रो हायब्रीड तंत्रज्ञान, डिजिटल अॅमोबिलायझर, इलेक्ट्रिकली ऑपरेट ड्युअल एचव्हीएसी, टिल्ट पावर स्टीयरिंग, पावर एडजेस्टेबल ओआरव्हीएम आदी फिचर्स मिळतील. (वाचा - Maruti S-cross चे कंपनीने लॉन्च केले लिमिटेड Addition, किंमत 8.56 लाख रुपये)
दरम्यान, या एसयूव्हीची लांबी 4550 मिलीमीटर, रुंदी 1890 मिलीमीटर, उंची 1785 मिलीमीटर, वजन 2510 किलो आणि वर्तुळाची त्रिज्या 5.6 मीटर, 70 लिटर इंधन टाकीची क्षमता आहे. याशिवाय या एसयूव्हीच्या समोरील भागामध्ये व्हेंटिलेटेड डेस्क आणि कॅलिपर प्रकारचे ब्रेक आहेत. Mahindra XUV500 च्या W5 BS6 (DIESEL)-FWD DIESEL व्हेरिएंटची किंमत 13.58 लाख रुपये इतकी आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)