Honda कंपनीची नवी कॅफे रेसर बाइक भारतात येत्या 16 फेब्रुवारीला होणार लॉन्च, कंपनीने टीझर जाहीर करत दिले संकेत
होंडा मोटरसायकल इंडिया यांनी भारतात गेल्या वर्षात H'ness CB350 लॉन्च केली होती. त्यानंतर आता कंपनीने हायनेस CB350 च्या प्लॅटफॉर्मवर काही नव्या बाइक्स लॉन्च करण्याचा विचार करत आहे.
Upcoming Honda CB 350 Cafe Racer: होंडा मोटरसायकल इंडिया यांनी भारतात गेल्या वर्षात H'ness CB350 लॉन्च केली होती. त्यानंतर आता कंपनीने हायनेस CB350 च्या प्लॅटफॉर्मवर काही नव्या बाइक्स लॉन्च करण्याचा विचार करत आहे. नुकतीच कंपनीने अधिकृत रुपात एक टीझर इमेज झळकवला आहे. त्याचे नाव Powered by Legacy Here to create stories म्हणजेच टीझर याची पुष्टी करतो की, 16 फेब्रुवारीला होंडा कंपनी वी मोटरसायकल लॉन्च करणार आहे.(Maruti WagonR आणि Ignis सारख्या दमदार गाड्या आता भाड्याने चालवता येणार, 12 हजारांपासून EMI सुरु)
अशी अपेक्षा केली जात आहे की, बाइक CB350 वर आधारित एक कॅफे रेसर असणार आहे. नवी होंडा CB350 कॅफे रेसरमध्ये स्थानिक रुपात विकसित 350cc इंजिनचा वापर केला जाणार आहे. ज्याची सुरुवात Honda CB350 क्लासिक पासून केली होती. हे इंजिन 21bhp ची पॉवर आणि 30Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्स मध्ये जोडला जाणार आहे. सध्या याच्या किंमती बद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु नव्या बाइकची किंमत 2 लाखांहून कमी असण्याची शक्यता आहे.
नवी मोटरसायकल होंडाची प्रीमियम डीलरशिप Big Wing नेटवर्कच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. होंडा फक्त CB350 वर आधारित कॅफे रेसर बल्कि नवी स्क्रॅम्बलवर ही काम करत आहे. कारण CB350 लॉन्चिंगवेळी होंडाने पुष्टी केली होती की, भारतात लवकरच मोठी टक्कर देणार आहे. मोटरसायकल एक अधिक मजबूत किंवा मोठी क्षमता इंजिन मिळवू शकते. दरम्यान, वाहन निर्माती कंपनीद्वारे या बद्दल काही खास पुष्टी करण्यात आलेली नाही.(Kia Motors भारतात लवकरच लॉन्च करणार स्वस्त 7 सीटर MPV, Ertiga सोबत होणार थेट टक्कर)
या बाइकमध्ये क्लासिक सिल्वर बार अॅन्ड मिरर्स, ब्लॅक आउट शॉक एब्जॉर्बर, फ्यूल टँकवर नवे ग्राफिक्स, कॅफे रेसर टाइप सिंगल पीस सीट आणि सीट काउल मिळणार आहे. टीझर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये नवे टेललॅम्प आणि वेगळ्या सीटरसह रियर प्रोफाइल पूर्णपणे संशोधित करण्यात येणार आहे. त्याचसोबत एग्जॉग्सट काळ्या रंगाचा दिला जाऊ शकतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)