Zombie Virus Sparks Pandemic Fear: झोंबी व्हायरस COVID-19 नंतर ठरणार आव्हान? घ्या जाणून

तोवरच आता झोंबी व्हायरस (Zombie Virus) डोके वर काढताना आढळतो आहे. संशोधकांच्या म्हणन्यासूनच एका 48,500 वर्षांपूर्वी गोठलेल्या तलावाखालून झोंबी नावाचा व्हायरस बाहेर पडत आहे.

Representational image (Photo Credit- ANI)

जागतिक तापमान वाढ (Global Warming) थांबण्याचे नाव घेत नसल्याने होणाऱ्या हवामान बदल( Climate Change) परिणाम जाणवू लागले आहेत. जगभरातीलच मानवजातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकेल, अशा घटना घडू लागल्या आहेत. कोरोना व्हायरस (COVID-19) महामारीने घातलेला धुमाकूळ आता कुठे कमी आलाआहे. तोवरच आता झोंबी व्हायरस (Zombie Virus) डोके वर काढताना आढळतो आहे. संशोधकांच्या म्हणन्यासूनच एका 48,500 वर्षांपूर्वी गोठलेल्या तलावाखालून झोंबी नावाचा व्हायरस बाहेर पडत आहे.

युरोपियन संशोधकांनी रशियाच्या सायबेरिया प्रदेशातील पर्माफ्रॉस्टमधून गोळा केलेल्या प्राचीन नमुन्यांची तपासणी केली. या नमुन्यांमध्ये आढळलेल्या विषाणूंनी 13 नवीन रोगकारक पुनरुज्जीवित केले आहेत. जो विषाणू अथवा परिस्थिती अनेक रोगांचे कारण ठरते त्याला रोगकारक म्हणतात. झोंबी व्हायरस अशाच रोगकारकामधून आला आहे, असे ब्लुमबर्गचा अहवाल सांगतो. न्यूयॉर्क पोस्टच्या मते, झोम्बी व्हायरसचे पुनरुज्जीवन झाल्याचे आढळल्यानंतर फ्रेंच शास्त्रज्ञांनी आणखी एका साथीच्या रोगाची भीती व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Measles Outbreak In Mumbai: गोवर आजाराचा संसर्ग कसा थांबवाल? मुलांना व्हायरल संसर्गापासून रोखण्यासाठी 6 महत्त्वाचे उपाय, घ्या जाणून)

संशोधकांचा अभ्यास सांगतो की, एखाद्या प्राचीन अज्ञात विषाणूच्या पुनरुज्जीवनामुळे वनस्पती, प्राणी किंवा मानवी रोगांच्या बाबतीत परिस्थिती अधिक विनाशकारी असेल. प्राथमिक अहवालानुसार, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून अपरिवर्तनीयपणे पर्माफ्रॉस्टचे भाग प्रचंड विरघळत आहेत. त्यामुले कायमस्वरूपी गोठलेली जमीन (जी उत्तर गोलार्धाच्या एक चतुर्थांश भाग व्यापते) वितळत आहे.

शास्त्रज्ञांनी फार पूर्वीच इशारा दिला आहे की, वातावरणातील तापमानवाढीमुळे पर्माफ्रॉस्ट वितळल्याने मिथेन सारख्या पूर्वी अडकलेल्या हरितगृह वायूंना मुक्त केले जाईल. ज्यामुळे हवामानातील बदल आणखी वाईट होतील. रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या संशोधकांच्या टीमने सांगितले की त्यांनी अभ्यास केलेल्या विषाणूंचे पुनरुज्जीवन होण्याचा जैविक धोका "पूर्णपणे नगण्य" आहे.