IPL Auction 2025 Live

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला दिलं 'कोविड-19' हे अधिकृत नाव

या आजाराची लागण झाल्याने चीनमध्ये आतापर्यंत 1 हजार पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. संपूर्ण जगात 'कोरोना व्हायरस' या नावाने प्रचलित झालेल्या या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने 'कोविड-19' असे अधिकृत नाव दिले आहे. चीनमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी पहिल्यांदा हा विषाणू आढळून आला होता.

WHO names the new coronavirus COVID-19 (Photo Credit: IANS)

चीनमध्ये गेल्या महिन्यापासून कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातलं आहे. या आजाराची लागण झाल्याने चीनमध्ये आतापर्यंत 1 हजार पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. संपूर्ण जगात 'कोरोना व्हायरस' या नावाने प्रचलित झालेल्या या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) 'कोविड-19' (COVID-19) असे अधिकृत नाव दिले आहे. चीनमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी पहिल्यांदा हा विषाणू आढळून आला होता.

कोरोना व्हायरसला 'कोविड-19' हे नाव देण्यामागचं कारण जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधानोम गेब्रेयेसुसने यांनी सांगितले आहे. 'कोविड-19' मधील को म्हणजे 'करोना', व्ही म्हणजे 'व्हायरस' आणि डी म्हणजे 'डिसीज'. या नावामागे विशिष्ट अर्थ दडलेला असल्याने कोरोनाचे 'कोविड-19' असे अधिकृत नामकरण करण्यात आले आहे. (हेही वाचा - Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरस ने घेतला 1000 च्या वर लोकांचा बळी; तर 40,000 हून अधिक या गंभीर आजाराच्या विळख्यात)

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1 हजार 110 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 42 हजार 708 नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूची निर्मिती कशी झाली, याचा शोध शास्त्रज्ञ करत आहेत. आतापर्यंत जगातील 25 देशांमध्ये हा आजार पसरला आहे. शास्त्रज्ञांकडून या आजारावर प्रतिबंधात्मक लस शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.