काय नोकरी आहे ? येथे कामादरम्यान झोपण्याची आहे पूर्ण मूभा !

ऑफिसमध्ये झोपण्याची परवानगी का आहे? कामादरम्यान कर्मचारी झोपल्यास अधिकारी त्यावर हरकत का घेत नाहीत?

ऑफिसमध्ये झोपणे (Photo Credits: Pinterest)

कधीतरी ऑफिसमध्ये तुम्हीही डुलकी मारली असेल. अनेकदा तर झोप अनावर झाल्याने ऑफिसमध्ये झोपायला मिळावे, असेही तुम्हाला वाटले असेल. तुमची ही इच्छा पूर्ण करणारे एक ऑफिस आहे. इथे तुम्हाला ऑफिसमध्ये झोपण्याची पूर्ण सूट आहे.

पण यासाठी तुम्हाला जपानला जावे लागेल. जपानमध्ये कामाच्या तासात झोप घेण्यासाठी एक टर्म आहे- इनेझुरी म्हणजेच उपस्थित पण झोपेत. पण या ऑफिसमध्ये झोपण्याची परवानगी का आहे? कामादरम्यान कर्मचारी झोपल्यास अधिकारी त्यावर हरकत का घेत नाहीत?

काय आहे नेमके कारण?

- तर त्याचे असे आहे की, जपानमध्ये कामाचे तास अधिक आहेत आणि त्यामुळे काही लोकांना रात्री फक्त ६ तास झोप मिळते.

- जगातील मेहनती लोकांमध्ये जपानमधील लोकांची गणना होते. त्यामुळेच कामाच्या वेळेत इथे कोणी डुलकी देत असल्यास किंवा झोपत असल्यास तो/ती खूप वेळ काम करत असल्याने दमली/दमला असेल असे समजले जाते.

- युद्धानंतर जपानमधील लोक देशाला पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेऊ लागले तेव्हापासून ऑफिसमध्ये झोपण्याची पद्धत सुरु झाली.

त्यामुळे तिथे ऑफिसमध्ये झोपणे हे अगदी सामान्य झाले आहे. ऑफिसमध्ये जात असताना गाडीत झोपणे किंवा मिटींगदरम्यान आराम करणे हे आता त्यांचे वर्क क्लचर झाले आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तुमच्या मनाला येईल तेव्हा तुम्ही झोपा काढाल. याचे देखील काही खास नियम आहेत.

काय आहेत नियम?

कॅम्ब्रिज यूनिवर्सिटी के स्कॉलर डॉ. ब्रिगेटने यांनी जपानी संस्कृतीवर खूप अभ्यास केला आहे. त्यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितले की, कंपनीमध्ये नवे असताना तुम्ही झोपू शकत नाही. त्यावेळेस तुम्हाला तुमचा उत्साह दाखवावा लागले.

पण जर तुम्ही ४०-५० वयोगटातील असाल आणि मिटींगमध्ये तुमच्या टॉपिकवर चर्चा होत नसेल तर तुम्ही झोपू शकता. तुम्ही समाजात जितक्या वरच्या पातळीवर असाल तितके जास्त झोपू शकता.

मिटिंगमध्ये झोपण्याची परवानगी असली तरी इनेमुरीच्या नियमानुसार, चर्चेत गरज पडल्यास तुमचे मत, मुद्दा मांडता येण्याच्या परिस्थितीत तुम्ही असायला हवे.

डॉ. स्टीगर यांनी सांगितले की, मिटिंगमच्ये असताना तुम्ही अॅक्टीव्ह आहात व लक्ष देत आहात असे भासवावे लागते. तुम्ही टेबलच्या खाली लपून झोपू नाही शकत. बसून ऐकत आहात असे भासवत हेड डाऊन करुन तुम्ही झोपू शकता.

आता आली नवी व्यवस्था

पण आता मात्र ही सूट रद्द करण्यात येईल आणि तो काळ जवळ आला आहे. कारण आता एक नवी व्यवस्था रुजत आहे. त्यामध्ये काम करताना झोपणाऱ्यांची ओळख पटवून घेतली जाईल. यात काम करताना डेस्कवर कोणी झोपल्यास कॅम्प्युटर ऑटोमेटीकली रुमचे तापमान कमी करेल. या सिस्टममध्ये ऑटोमेटीकली अडजस्ट होणारे तापमान आणि आयलिड मुव्हमेंट (डोळ्यांची हालचाल) यावर लक्ष ठेवण्यासाठी एनईसीचे फेशियल रिकगनीशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif