WFH or WFO: ऑफीसमधून काम करताना 25% कर्मचारी कामापेक्षा देतात 'या' गोष्टीला प्राधान्य; घ्या जाणून

प्रदीर्घ काळ घरुन काम केल्यानंतर त्याचे बरेचसे फायदे आणि काही तोडेही समोर आले. दरम्यान, अनेक कर्मचारी हे घरुन काम करण्यास प्राधान्य देतात.

WFH Or WFO | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर जगभरात घरुन काम करण्याची म्हणजेच 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) संकल्पनेला अधिक बळ मिळाले. प्रदीर्घ काळ घरुन काम केल्यानंतर त्याचे बरेचसे फायदे आणि काही तोडेही समोर आले. दरम्यान, अनेक कर्मचारी हे घरुन काम करण्यास प्राधान्य देतात. दुसऱ्या बाजूला काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफीस (Work From Office) सुरुही केले. मात्र, कामासाठी ऑफीसमध्ये हजेरी लावणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी कामासोबतच इतरही काही गोष्टींना प्राधान्य दिले. ज्यात करीअर विकास, करीआरची बदल, विविध कौशल्ये कशी विकसीत करता येतील किंवा इतर कोणते व्यावसाईक प्रशिक्षण घेतायेईल काय? याबद्दल चाचपणी सुरु केली.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ निकोलस ब्लूम यांचा समावेश असलेल्या डब्ल्यूएफएच रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात प्रकाशित करण्यात आलेल्या माहतीनुसार, कार्यालयातील कर्मचारी त्यांच्या दूरस्थ समकक्षांपेक्षा (वर्क फ्रॉम होम) करिअर-विकासाच्या कृतींमध्ये 25% अधिक वेळ घालवतात. वर्क फ्रॉम होम संपल्यावर कर्मचारी जे कामावर आले, त्यांनी आठवड्यातून सुमारे 40 मिनिटे इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी, औपचारिक प्रशिक्षणासाठी सुमारे 25 अधिक मिनिटे आणि व्यावसायिक विकास आणि शिक्षण क्रियाकलापांसाठी प्रत्येक आठवड्यात सुमारे 15 अतिरिक्त मिनिटे दिली. (हेही वाचा, Work From Home: कंपनीने संपवले वर्क फ्रॉम होम; कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावल्यानंतर 800 लोकांनी दिला राजीनामा)

यूएसमध्ये सुमारे 2,400 पेक्षाही अधिक सर्वेक्षणावर आधारीत आकडेवारीतुन पुढे आले की, अनेक कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम' संकल्पनेला प्राधान्य देतात. त्यातील बहुतांश कर्मचारी हे कामात आणि घरुन काम करण्यातही सक्षम आहेत. वर्क फ्रॉम होम या संकल्पनेस जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीचे जेमी डिमन आणि मॉर्गन स्टॅन्लेचे जेम्स गोरमन यांसारख्या सीईओंना विचाराल तर ते ा संकल्पनेला समर्थन देतात. मात्र, पुढे ते हे देखील सांगतात की, शिकाऊ आणि खास करुन तरुण करमचाऱ्यांना आपल्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अधिक अनुभवी सहकाऱ्यांसोबत शिकण्यासठी स्वत:ला विकसीत करण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांनी अधिक वेळ कार्यालयात असणे आवश्यक आहे.

'वर्क फ्रॉम होम' प्रणालीत काम करणाऱ्या जवळपास निम्मे कर्मचारी हे केवळ तात्पूरत्या व्यवस्थेवर काम करतात. परिणामी ते केवळ एक तृतीयांश इतक्या प्रमाणात आपल्या कामसाठी वेळ देत असतात. दुसऱ्या बाजूला, 20% कर्मचारी रिमोट असतात, असे WFH संशोधनातील डेटा दर्शवितो. अर्थात, आकड्यांमध्ये बदल शक्य आहे. दरम्यान, 'वर्क फ्रॉम होम' विरुद्ध 'वर्क फ्रॉम ऑफीस' या मुद्द्यावर प्रत्येकाची मते आहेत. जी व्यक्तीसापेक्ष आहे. त्यामुळे अद्याप तरी ठोस असा कोणताही निष्कर्ष पुढे आला नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif