WFH Employee Fired: कंपनीने ठेवली पाळत; 'वर्क फ्रॉम होम'च्या नावाखाली केलेली मजा अंगाशी; 18 वर्षांच्या नोकरीवर गदा

तर कंपनीने दिलेले स्पष्टीकरण वेगळे आहे. कंपीने म्हटले आहे की, त्यांची कर्मचारी सुजी ही घरुन काम (WFH) करत असे. वर्क फ्रॉम होम (Work From Home) प्रणालीचा गैरफायदा घेत ती कामात टाळाटाळ करत असे तर कधी उशीरा काम सुरु करुन निश्चित वेळेच्या बरेचसे आगोदर संपवत असे.

Work From Home | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

प्रदीर्घ काळापासून इन्शुरन्स ऑस्ट्रेलिया ग्रुप (Insurance Australia Group) सोबत काम करणारी विमा सल्लागार सुझी चेइखो (Suzie Cheikho,) हिला कंपनीने कामावरुन काढून टाकले आहे. एकदोन नव्हे तर तब्बल 18 वर्षे कंपनीसोबत काम करणाऱ्या या महिला विमा सल्लागारास कंपनीने नोकरीवरुन काढून टाकले आहे. सुझी हिने आपल्यासोबत घडलेली घटना विविध माध्यमांतून कथन केली आहे. तर कंपनीने दिलेले स्पष्टीकरण वेगळे आहे. कंपीने म्हटले आहे की, त्यांची कर्मचारी सुजी ही घरुन काम (WFH) करत असे. वर्क फ्रॉम होम (Work From Home) प्रणालीचा गैरफायदा घेत ती कामात टाळाटाळ करत असे तर कधी उशीरा काम सुरु करुन निश्चित वेळेच्या बरेचसे आगोदर संपवत असे.

मूल्यमापण प्रक्रियेदरम्यन कर्मचारी आढळला दोषी

सुझी चेइखो, 38 वर्षीय वर्क-फ्रॉम-होम (WFH) कर्मचारी, तिने खुलासा केला की 18 वर्षे सेवा केल्यानंतर तिला इन्शुरन्स ऑस्ट्रेलिया ग्रुपमधील तिच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. तिच्या कार्यप्रदर्शन आणि आउटपुटबद्दल नोव्हेंबर 2022 मध्ये जारी केलेल्या औपचारिक इशाऱ्यानंतर तिची नोकरी संपुष्टात आली. तथापि, कंपनीने म्हटले आहे की, ही एक कामगिरी मूल्यमापनाची प्रक्रिया आहे. दरम्यान, नोकरीवरुन काढण्याचे कारण काहीही असले तरी या घटनेने मोठ्या प्रमाणात लोकांचे लक्ष वेधले आहे. (हेही वाचा, Work From Home and Sex Survey: 'वर्क फ्रॉम होम' करताना कामाच्या वेळी कर्मचाऱ्यांकडून सेक्स आणि मद्यपान; सर्व्हेमध्ये धक्कादायक खुलासे)

कंपनीने ठेवली नजर

वर्क फ्रॉम होम कल्चरमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यास कामावरुन काढून टाकलेबद्दल वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी वेगवेगळ्या तक्रावर आधारीत वृत्त दिले आहे. news.com.au ने म्हटले आहे की, चेखो ही कामगिरी सुधारण्याच्या योजनेदरम्यान व्यवस्थापनाच्या छाननीच्या कक्षेत सापडली. कंपनी व्यवस्थापनाने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तिच्या 49 कामकाजी दिवसांचे कार्यालयीन वेळेनुसार निरीक्षण केले गेले. ज्यामध्ये आढळून आले की, तिला 20 फेब्रुवारी रोजी डेडलाइन पूर्ण करण्यात वारंवार अपयश आले. तसेच, अनेकदा आभासी स्वरुपात होणाऱ्या कार्यालयीन मीटिंगमध्येही तिची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. ज्यामुळे फेअर वर्क कमिशनला (FWC) आढळळे की ती वारंवार तिच्या नियोजित कामाच्या वेळेपासून विचलित होते. कामास उशीरा सुरुवात करते आणि काम कार्यालयाच्या निश्चित वेळेपेक्षा आधीच बंद करते. (हेही वाचा, WFH or WFO: ऑफीसमधून काम करताना 25% कर्मचारी कामापेक्षा देतात 'या' गोष्टीला प्राधान्य; घ्या जाणून)

चोईके हिने घडल्या प्रकाराबद्दल बोलताना म्हटले आहे की, कंपनीकडून अलिकडेच तिला अंतिम पगार मिळाला. मी TikTok वरून थोडेफार पैसे कमवते. जे केवळ माझे बिल भरण्यासाठी पुरेसे आहे. हे सर्व माझ्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. दरम्यान, आपला अनुभव ऑनलाईन मंचावरुन शेअर केल्यापासून ती इंटरनेट आणि सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. तिच्या TikTok वर जवळपास 8000 फॉलोअर्ससह ती आता एक प्रकारची मायक्रो-इन्फ्लुएंसर बनली आहे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, भारतात TikTok प्रतिबंधीत आहे.