Coronavirus Outbreak: US सेनेटर रैंड पॉल COVID-19 पॉझिटीव्ह तर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी घेतला होम क्वारंटाईन चा निर्णय
त्यांची कोरोनाची चाचणी केली असून त्याचे रिपोर्ट्स अद्याप हाती आलेले नाहीत.
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) अनेक देशांना आपले लक्ष्य केले आहे. या विषाणूने जगभरात लाखो लोकांचा बळी घेतला आहे. जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल (Angela Merkel) यांनी देखील स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी केली असून त्याचे रिपोर्ट्स अद्याप हाती आलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी एंजेला यांना न्युमोकोकल इन्फेक्शन साठी लस देण्यात आली होती. मात्र ज्या डॉक्टरने लस दिली होती तो कोरोनाबाधित होता. त्यामुळे एंजेला मर्केल त्यांनी घरात विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची पत्नी सोफी या कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या समोर आले होते. त्यानंतर इराणचे डेप्युटी हेल्थ मिनिटस्ट इराज हरीर्शी तर ब्रिटेनचे आरोग्यमंत्री नदीन डोरिस हे कोरोना संक्रमित होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डटन यांनीही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau यांच्या पत्नी Sophie यांना कोरोना व्हायरसची लागण)
APF च्या वृत्तानुसार, युएस सेनेटर रैंड पॉल (Rand Paul) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसची त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
कोरोना व्हायरस या जागतिक संकटाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. इटलीत कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. काल (रविवार, 22 मार्च) रोजी 651 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत इटलीत तब्बल 5500 हून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर अमेरिकेत 100 कोरोनाग्रस्त रुग्ण मरण पावले आहेत.